scorecardresearch

आता छोटे व्यवसायिक आणि दुकानदारांच्या जाहिरातींमध्येही झळकणार शाहरुख खान

या जाहिरातीमध्ये शाहरुख खान कोरना महामारीच्या काळात तोटा झालेल्या छोट्या उद्योगांचं आणि दुकानदारांचं प्रमोशन करताना दिसत आहे.

आता छोटे व्यवसायिक आणि दुकानदारांच्या जाहिरातींमध्येही झळकणार शाहरुख खान
(Photo-Youtube)

दिवाळीचा सण जवळ आला की अनेक कंपन्यांच्या आणि उत्पादनांच्या नव्या जाहिराती लोकांचं लक्ष वेधून घेऊ लागता. अनेक बड्या कंपन्या या विचार करायला लावणाऱ्या आणि सहानुभूतीपूर्ण जाहिराती तयार करण्यासाठी ओळखल्या जातात. आपल्या जाहिरातींच्या माध्यामातून या कंपन्या नाते-संबधांवर आणि सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे कॅडबरी. दरवर्षी दिवाळीत कॅडबरी आपल्या हटके जाहिरांतीच्या माध्यामातून लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. यंदाच्या कॅडबरीच्या जाहिरातीमध्ये शाहरुख खान झळकत असून एका खास मुद्द्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

या जाहिरातीमध्ये शाहरुख खान कोरना महामारीच्या काळात तोटा झालेल्या छोट्या उद्योगांचं आणि दुकानदारांचं प्रमोशन करताना दिसत आहे. या व्हिडीओत कंपनीने आम्ही शाहरुख खानला अनेक लहान व्यवसायांचं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवून मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हंटलं आहे. तर जाहिरातीमध्ये शाहरुखने शेरवानी परिधान केल्याचं दिसतंय. यात तो दिवाळीसाठी त्याने आजुबाजूच्या दुकानांमधूनच सर्व शॉपिंग केल्याचं सांगत प्रेक्षकांनी देखील आजुबाजुच्या दुकानांमधूनच वस्तू आणि दिवाळीची खरेदी करण्याचं आवाहन केलंय.

“तुम्ही आता जे आहात त्यासाठी कृतज्ञ रहा”, नागा चैतन्यासोबतच्या घटस्फोटानंतर समांथाची पोस्ट

महत्वाचं म्हणजे मशीन लर्निंगचा वापर करून या जाहिरातीमधील शाहरुख खानचा महत्वाचा भाग शूट करण्यात आलाय. म्हणजेच शाहरुख खान सांगत असलेल्या दुकांनांची नावं ही शाहरुखचा चेहरा आणि त्याचा व्हॉईस ओव्हर जुळवण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करण्यात आलाय. सर्वच दुकानांच्या नावाचा समावेश करणं शक्य नसल्याने हे तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. एवढचं नव्हे तर आता मशीन लर्निंगच्या मदतीने अनेक दुकानदारांना शाहरुख खानला घेऊन त्यांच्या दुकानाची जाहिरात करता येणार आहे. ‘नॉट जस्ट ए कॅडबरी अॅड’ असं म्हणत कंपनीने कोणत्याही व्यावसायिकाला किंवा दुकानदाराला शाहरुखच्या या व्हिडीओचा वापर करुन जाहिरात बनवण्याचे अधिकार दिले आहेत.

ही जाहिरात यूट्यूबवर अपलोड होताच चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने केलेल्या प्रयत्नाचं अनेकांनी कौतुक केलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 16:06 IST

संबंधित बातम्या