रणबीर कपूर आणि त्याची तथाकथित प्रेयसी कतरिना कैफ चुंबन करतानाचे छायाचित्र काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. या छायाचित्रानंतर रणबीर-कतरिना वेगळ होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
रणबीर-कतरिनामध्ये सर्व काही आलबेल आहे असे वाटत असतानाच सोमवारी एका ट्रेलरच्या अनावरणावेळी कतरिनाने सर्वांना चकित करून टाकले. रणबीर आणि ती चुंबन घेतानाच्या छायाचित्राबाबत विचारले असता आपण जणू याबाबत अनभिज्ञ असल्याचे कतरिनाने दाखविले. या दोघांचे हे छायाचित्र काहीसे फितूर या तिच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरप्रमाणे दिसते. ख-या आयुष्यातील तो क्षण आणि फितूरचे पोस्टर यामधील साम्याबद्दल विचारले असता कतरिनाने पत्रकारांना उलट प्रश्न केला, कुठे आहे तो फोटो? मला दाखवा.. जेव्हा तिला सांगितले की, ते छायाचित्र वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आहे तर कतरिना म्हणाली, अच्छा! वृत्तपत्रात आले आहे.
यापूर्वी, २०१३ साली कतरिनाचे बिकनीमधील समुद्रावरील छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यावेळी रणबीरही तिच्यासोबत होता. तेव्हापासून या दोघांमधील प्रेमप्रकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2016 रोजी प्रकाशित
किसींग सीनः रणबीरसोबतच्या ‘त्या’ छायाचित्रावर कतरिनाची प्रतिक्रिया..
रणबीर-कतरिना 'किस' करत असतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 05-01-2016 at 12:41 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaifs reaction to picture of her kissing ranbir kapoor on new years eve