बिग बी अमिताभ बच्चन करोनातून बरे झाले असून त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती-१४’ची शुटिंग पुन्हा सुरू केली आहे. हा क्विझ शो दिवसेंदिवस रंजक होत आहे. बिग बींनी शोमधील स्पर्धकांबरोबर केलेल्या गप्पा देखील चर्चेत असतात. प्रत्येक एपिसोडमध्ये येणाऱ्या स्पर्धकांशी अमिताभ बच्चन मजेदार संवाद साधताना दिसतात. नुकतंच एका एपिसोडमध्ये स्पर्धकाने सांगितले की त्याने अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहिलेले त्याच्या पत्नीला आवडत नाही. हे ऐकल्यानंतर बिग बींनी कपाळावर हात मारून घेतला.

मणिरत्नम यांनी रजनीकांत यांना चित्रपटात ‘ही’ भूमिका देण्यास नकार दिला; दिग्गज अभिनेत्याचा खुलासा

६ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये भुवनेश्वर येथील कृष्णा दास नावाचे स्पर्धक हॉट सीटवर बसले होते. दास यांनी शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांना ओडिशातील जगन्नाथ मंदिरातून आणलेला प्रसाद दिला. त्यानंतर खेळ सुरू झाला आणि त्यांनी साडेबारा लाख रुपये जिंकले. पण दास यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाबद्दल केलेल्या एका खुलास्यामुळे हा एपिसोड रंजक बनला.

आशिकी ३ मध्ये कार्तिक आर्यनबरोबर दिसणार जेनिफर विंगेट? निर्माते म्हणाले…

खेळादरम्यान दास यांनी सांगितले की, त्यांना वाटते की त्यांची पत्नी त्यांच्यावर अजिबात प्रेम करत नाही. यावर अमिताभ यांनी विचारले की, त्यांना असं का वाटतं? यावर दास यांनी सांगितले की, जेव्हाही मी तुमचा चित्रपट पाहतो तेव्हा माझी पत्नी रागावते आणि म्हणते, “तुम्ही फालतू चित्रपट का पाहताय?” दास यांनी असं म्हणताच चेहऱ्यावरचे बदललेले भाव घेऊन अमिताभ म्हणाले, ‘थांबा, जरा तुम्ही बोलताय ते पचवू द्या.” त्यानंतर अमिताभ यांनी दास यांच्या पत्नीला विचारलं की ”आम्ही इतके फालतू चित्रपट बनवतो का?” हे ऐकून तिथे बसलेले प्रेक्षकही हसू लागले. नंतर दास यांच्या पत्नीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दास यांनी आपण मनमोहन देसाईंच्या ‘तूफान’ चित्रपटाबद्दल बोलत असल्याचं सांगितलं. तसेच हा चित्रपट त्यांच्यात वादाचे कारण बनतो, असंही ते म्हणाले.

“त्या भीतीने लोक…”; ‘गुडबाय’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात एकता कपूर अश्रू अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. आता ते करोनातून बरे झाले असून त्यांची या शोचे शुटिंग पुन्हा सुरू केले. याशिवाय अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.