सध्या महाराष्ट्रात केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टचा मुद्दा बराच गाजताना दिसत आहे. अभिनेत्री केतकी चितळेनं तिच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केतकी चितळे हिला कळंबोली येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री मानसी नाईकने प्रतिक्रिया दिली आहे. केतकीच्या वर्तनावर मानसीने संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री मानसी नाईकने टीव्ही ९ मराठीशी बोलाताना यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “आपण मराठी आहोत आणि मराठी माणसाने अशाप्रकारे कोणाबाबतही असं बोलणं खरं तर लज्जास्पद आहे. मला ती जे बोलली ती अजिबात आवडलेलं नाही आणि शरद पवार यांच्याबद्दल अशाप्रकारचं बोलण्याआधी किंवा लिहिण्याआधी दोन वेळा विचार केला पाहिजे आणि केतकीने जे काही केलं ते बरोबर नाही. असं कोणीच करूही नये. त्यासाठी जो कोणी असं करेल त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून पुन्हा असं काही बोलताना कोणतीही व्यक्ती विचार करेल. वडिलधाऱ्यांबद्दल असं बोलणं तर अतिशय चुकीचं आहे.”

आणखी वाचा- “पवार साहेबांच्या पायापर्यंत नाही आणलं ना तर…” केतकी चितळे प्रकरणावर सविता मालपेकर यांची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सध्या महाराष्ट्रात केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे. केतकीनं शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आक्षेपार्ह शब्दात टीका करण्यात आली होती. यावरून केतकी चितळेवर कारवाई देखील करण्यात आली. तसेच सोशल मीडियावरूनही तिच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. शरद पवार यांच्याबद्दल अशा प्रकारची पोस्ट शेअर करणं केतकी चितळेला चांगलंच महागात पडलेलं दिसत आहे.