‘खतरों के खिलाडी ११’मध्ये अभिनेत्रीचं धाडस पाहून स्पर्धक थक्क; म्हणाले “व्वा शेरनी तू तर…”

‘खतरों के खिलाडी’चा ११ वा सीजन सध्या टीव्हीवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

divyanka
Photo-(Photo-Instagram/Divyanka Tripathi)

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय स्टंटबेस्ड रिअ‍ॅलिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’ आहे. हा सीजन सध्या टीव्हीवर धुमाकूळ घालत आहे. यात कलासृष्टीतले लोकप्रिय कलाकार कठीण स्टंट परफॉर्म करताना दिसतात. हा शो सुरू झाल्यापासून स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. कलर्स वाहिनीवरील ‘खातरों के खिलाडी’मधील सगळेच स्पर्धक उत्तम स्टंट परफॉर्म करताना दिसत आहेत. मात्र काही एपिसोडपासून दिव्यांका त्रिपाठीचे स्टंट्स प्रेक्षकांना प्रभावित करत आहेत. ती या सीजनमध्ये एकापेक्षा एक स्टंट परफॉर्म करताना दिसत असून इतर स्पर्धकांना चागलीचं टक्कर देताना दिसत आहे.

या वीकएंडच्या एपिसोडला दिव्यांका त्रिपाठी, महक चहल आणि विशाल आदित्य सिंग एक स्टंट परफॉर्म करत होते. या स्टंटमध्ये झोपाळा हवेत लटकत होता आणि खाली पाणी होतं. एक जरी पाऊल चुकीचं पडलं असतं तर त्या स्पर्धकांना सरळं पाण्यात उडी मारावी लागणार होती. विशाल हा स्टंट करण्यात अयशस्वी झाला. महक चहलने हा स्टंट करण्या करता १०मिंनिटं लावली तर दिव्यांकाने तर संगळ्याना चाट पाडले.

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने हा स्टंट चक्क ३ मिनिटं ३६ सेकंदामध्ये संपवला. दिव्यांकाच हे साहस पाहून स्पर्धकां बरोबरच सूत्रसंचालक रोहित शेट्टी ही शॉक झाला. त्याने दिव्यांकाला  प्रश्न विचारला की, “तू ज्या बिल्डिंगमध्ये राहतेस त्याला पण असे झोपाळे लटकवले आहेत का? दिव्यांकाच्या या स्टंट नंतर सगळे तिला शेरनी म्हणताना दिसले. तसंच ट्विटरवर पण तिचं कौतुक होताना दिसलं. एका युजरने लहिले की, “आमच्या शेरनीने कमाल केली. पाया दुखत असताना देखील………आम्हाला तुमचा अभिमान आहे. खूप छान स्टंट परफॉर्म केलास.”

याआधी देखील दिव्यांका कठीण स्टंट्स परफॉर्म करताना दिसली होती. एकदा तर तिने जिवंत मगर हातात घेतली होती. ‘खतरों के खिलाडी ११’मध्ये राहुल वैद्य, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, सना मकबूल, विशाल आदित्य सिंह, अभिनव शुक्ला, आस्था गिल, महक चहल आणि निक्की तंबोळी सारखे सेलिब्रिटीज हे स्प्धक म्हणून सहभागी झाले आहेत. केपटाउनमधून या सर्व स्पर्धकांचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज देखील समोर आले होते. त्यांचे सर्व फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ‘खतरों के खिलाडी ११’ चे एपिसोड्स दर शनिवार-रविवार रात्री ९.३० वाजता कलर्सवर पहायला मिळतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Khatro ke khiladi 11 fans calls divyanka tripathi sherni for her recent stunt aad

ताज्या बातम्या