‘कबीर सिंह’ या चित्रपटाला मिळालेल्या अपार यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सतत चर्चेत येत आहे. कियारा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असते. मात्र अलिकडेच तिचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. कियाराने इन्स्टाग्रामवर ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
कियाराचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर अद्याप तरी त्याच्यावरुन कोणतीही पोस्ट शेअर करण्यात आलेली नाही. मात्र कियाराच्या फॉलोअर्सला काही लिंक्स पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे कियाराने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत ही माहिती दिली.

‘माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. ही समस्या लवकरात लवकर दूर व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सगळ्यांना विनंती आहे की माझ्या अकाऊंटवरुन काही चुकीचे संदेश आले तर कृपया त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि कोणतीही लिंक आली तर त्यावर क्लिक करु नका. माझं अकाऊंट हॅक झालं आहे, त्यामुळे तुम्हाला येणारे मेसेज मी करत नाहीये’, असं कियाराने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या सेलिब्रिटीचं अकाऊंट हॅक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अमिताभ बच्चन, शाहिद कपूर, महेश भट्ट, क्रिती सेनॉन यांचंही ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. दरम्यान, ‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे विशेष चर्चेत आलेली कियारा लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘गुडन्युज’,’भूल भुलैय्या २’ आणि ‘शेरशाह’ या चित्रपटात झळकणार आहे.