किंग ऑफ पॉप या नावाने जगप्रसिद्ध असलेला अमेरिकी गायक आणि डान्सर मायकल जॅक्सनची मुलगी पॅरिस जॅक्सनने ती लेसबियन असल्याचे मान्य केले आहे. ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री कारा डेलेवेनसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे पॅरिसने स्पष्ट केले. १९ वर्षीय पॅरिसने नुकतीच तिच्या नात्याची कबुली दिली. पॅरिसचा भाऊ प्रिन्सने त्याच्या मित्रांना सांगितले की, आज जर त्याचे बाबा जीवंत असते तर पॅरिसच्या या नात्याचा त्यांना अभिमान वाटला असता. रडार ऑनलाइनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रिन्स म्हणाला की, ‘आपली मुलगी तिचे निर्णय स्वतः घेतेय याचा वडिलांना गर्व वाटला असता. वडिलांनी तिला लहानपणापासूनच शिकवले होते की, प्रेमाला कोणती बंधनं नसतात. यात शरीर, लिंग यांसारख्या गोष्टींचाही समावेश नसतो.’

पॅरिस आणि कारा यांच्या रिलेशनशिपबद्दल आधीपासूनच चर्चा होत होती. मात्र आता पॅरिसने त्यावर होकार देऊन मोहर लगावली. संपूर्ण जॅक्सन कुटुंबिय पॅरिसच्या या निर्णयाने खुश आहेत. गेल्या आठवड्यात पॅरिस आणि कारा एकमेकांना किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघी तेव्हा डबल डेटवर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत मैकॉले कल्किन आणि तिची गर्लफ्रेंड ब्रेंडा स्ट्रॉन्गही होती.

पॅरिस इन्स्टाग्रामवर फार सक्रीय आहे. तिने डेलेवेनसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्या दोघी एकत्र कॅरल सिनेमा पाहत आहेत. या सिनेमाचा विषय लेसबियन संबंधांवर आधारित होता. पॅरिस आणि काराची पहिली ओळख २०१७ मध्ये झाली. एमटीव्ही मूव्ही अॅण्ड टीव्ही पुरस्कार सोहळ्यामध्ये या दोघी पहिल्यांदा भेटल्या होत्या.