बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं. त्यानंतर ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर तिचे आणि विकीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यात आता अंकिताचा आणि विकी जैनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

अंकिता आणि विकीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत अंकिता कोणत्या शूटसाठी फिल्मसिटीमध्ये पोहोचली होती. याच दरम्यान, अंकिताची भेट अभिनेत्री क्रिती सेननशी झाली. त्यांच्या भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या दोघींनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर क्रिती पुढे निघून जात होती आणि तिने अंकिताचा पती विकी जैनकडे पाहिले ही नाही, तरी सुद्धी विकी तिच्याकडे जात होता हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अंकिता आणि विकी जैनला ट्रोल करण्यात आले.

आणखी वाचा : गौरी खाननं घेतला होता शाहरुखला सोडण्याचा निर्णय, पण…

आणखी वाचा : …म्हणून समांथाने लग्नाची ‘ती’ साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला केली परत

आणखी वाचा : “योगीजी हरले नाही तर भारतात परत येणार नाही”, केआरकेने केले होते ट्वीट पण निवडणुकीचे निकाल लागताच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता आणि विकीला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाली, “क्रितीला त्यांच्याशी बोलायचं नव्हतं पण अंकिताने स्वत: तिला हाक मारली.” दुसरा नेटकरी म्हणाला, “ती तुला भाव देत नाही मग कशाला बोलतेस.” तिसरा नेटकरी म्हणाला, “ते नेहमी उदास का दिसतात”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केले आहे. या व्यतिरिक्त त्या दोघीं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.