बॉलीवूड अभिनेता कमाल आर खान हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो त्याचं मतं मांडताना दिसतो. बऱ्याचवेळा त्याने बॉलिवूड कलाकारांवर टिका करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. एवढचं काय तर बऱ्याच वेळा केआरकेने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. मुख्यमंत्री योगी ही निवडणूक जिंकणार नाहीत, असा दावा केला आणि असे झाल्यास तो भारतातून कायमचा निघून जाईल म्हणाला होता.

एवढचं काय तर पराभूत झाल्यास योगी यांना त्याने नेपाळला जाण्याचा सल्लाही दिला होता. यासोबत जसा जसा निकालचा दिवस जवळ येत होता. तसा केआरके योगी यांच्याविषयी सतत ट्वीट करत आहे. तर निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी, केआरकेने योगी यांच्याबद्दल ट्वीट केले आहे. “फक्त एक दिवस बाकी आहे, योगीजींचे जाण्यासाठी. बाय बाय योगी जी.” त्याच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला झाला.

Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”

आणखी वाचा : पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं मोदी आणि अमित शाह यांना दुख:; अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : ‘झुंड’ पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर येताच अनुराग कश्यपने नागराज मंजुळेंना मारली मिठी; म्हणाला “मी आतापर्यंत…”

आणखी वाचा : …म्हणून समांथाने लग्नाची ‘ती’ साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला केली परत

केआरकेला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, “केआरके सर जी. यावेळी तुम्ही चुकीचे आहात. योगीजी किमान २४७ जागांवर विजयी होत आहेत. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.” दुसरा नेटकरी केआरकेचं एक जुन ट्वीट शेअर करत त्याला भारत सोडण्याची आठवण करून दिली आहे. “खान साहेबांना आपल्या वचनाचे पालण करण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी केआरकेला ट्रोल केले आहे.

Story img Loader