‘त्याला पॉर्न इंडस्ट्रीचा राजा बनायचं होतं’, अभिनेत्याने उडवली राज कुंद्राची खिल्ली

सोशल मीडियावर राज कुंद्राची जोरदार खिल्ली उडवण्यात येतेय. यात केआरके कसा मागे राहिल? म्हणाला, “कुंद्रा भावाची जय हो…शिल्पा वहिनीची जय हो…..”

krk-makes-fun-of-raj-kundra-and-shilpa-shetty
(Photo: Instagram/rajkundra9)

अश्लील क्लिप तयार करून त्या अ‍ॅपसाठी विकल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आलीय. त्यानंतर सोशल मीडियावर राज कुंद्राची जोरदार खिल्ली उडवण्यात येतेय. यात प्रसिद्ध चित्रपट समिक्षक, अभिनेता कमाल आर. खान कसा मागे राहिल? कमाल आर खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींशी पंगा घेताना दिसतो. यावेळी त्याने पोर्नोग्राफीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राज कुंद्राची आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची खिल्ली उडवली आहे.

प्रसिद्ध चित्रपट समिक्षक, अभिनेता कमाल आर. खान म्हणजे केआरके याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत ही खिल्ली उडवली आहे. यात त्याने लिहिलंय, “मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्रा पॉर्न इंडस्ट्रीमधला मोठा राजा बनण्यासाठी प्लॅनिंग करत होता…तो जगभरात पोर्नचं लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याच्या तयारीत होता…वाह, काय प्लॅन होता…कुंद्रा भावाची जय हो…शिल्पा वहिनीची जय हो…”. केआरकेच्या या ट्विटनंतर युजर्सनी सुद्धा त्याला पाठिंबा देत राज कुंद्राला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. यात राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा ट्रोलर्सचं टार्गेट बनली आहे. राज कुंद्राचं हे प्रकरण उघड पडल्यानंतर तिचे चाहते तिच्यावर भलतेच नाराज झाले आहेत.

krk-tweet-on-raj-kundra=shilpa-shetty

केआरकेचं हे ट्विट काही मिनीटांतच सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं. पण त्यानंतर काही तासाभरातच केआरकेनं हे ट्विट ताबडतोब डिलीट सुद्धा केलं.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्या व्हिआन कंपनीच्या ऑफिसमधून काही अश्लील चित्रफिती हाती लागल्या आहेत. लंडनमधली केनरीन कंपनी महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये ब्रेक देऊ, असं आमिष दाखवून त्यांना न्यूड सीन करायला लावायचे. त्या क्लिप्स काही अ‍ॅप्स आणि वेबसाईट्सना विकल्या जात होत्या. या केनरीन कंपनीचं अकाऊंटिंग आणि कंटेण्ट तयार करण्याचं काम राज कुंद्राच्या व्हिआन कंपनीच्या ऑफिसमधूनच होत असे. या प्रकरणात हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे राज कुंद्राला अटक करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Krk makes fun of raj kundra and shilpa shetty pornography case arrest prp