‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर रिलीज; तीन मित्रांची धमाल रोड ट्रिप

अभय महाजन, ललित प्रभाकर आणि आलोक राजवाडे आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील.

kranti
Photo-Loksatta file photos

कधी कधी तुम्हाला आयुष्यात काही गोष्टी सुरळीत होण्यासाठी तुमच्या जवळच्या मित्रांसोबत फक्त एका रोड ट्रिपची गरज असते. अशीच मित्रांची एक धमाल गोष्ट ‘शांतीत क्रांती’ या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्यातून मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध पाहता येईल. ही श्रेयस, प्रसन्न आणि दिनार या तीन मित्रांची गोष्ट आहे. ‘शांतीत क्रांती’ ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची गोष्ट आहे. एक साधी रोड ट्रिप त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणते. ती त्यांना आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि आयुष्यातील कधीही न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवण्याची संधी देते.

‘शांतीत क्रांती’ ही शांतता आणि कल्याणाचे प्रतीक असून या शोमध्ये सुंदर पद्धतीने तीन मित्रांची मैत्री दाखवली आहे. भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भाडिपाचा संस्थापक सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांचे दिग्दर्शन असलेल्या या शोमध्ये लोकप्रिय मराठी कलाकार अभय महाजन, ललित प्रभाकर आणि आलोक राजवाडे आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील. या शोमध्ये लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री शिखा तलसानिया मराठीत प्रथमच दिसणार असून ती प्रमुख भूमिकेत दिसेल.

नात्यातील असुरक्षिततेसारख्या समस्या, आयुष्यातील अशाश्वता, अपूर्ण स्वप्ने अशा समस्यांचा सामना करण्यापासून हा शो नवीन दृष्टीकोन आणि शिकवण हलक्याफुलक्या पद्धतीने लोकांसमोर आणतो. शांतीत क्रांती ही फक्त तीन जवळच्या मित्रांची कथा नाही तर त्यांचा स्वतःचा शोध आणि ओळख यांच्या दिशेने त्यांनी केलेला हा प्रवास आहे. आश्चर्यकारक, हास्याच्या उकळ्या फुटणारे क्षण, रस्त्यावरील अनुभव, दिलखेचक संवाद आणि ताल धरायला लावणारे रॅप संगीत यांच्यामुळे हा शो नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

या शोचे दिग्दर्शक सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन म्हणाले की, “शांतीत क्रांती हा फक्त शो नाही तर तो आयुष्याचा एक सुंदर अनुभव आहे. ही कथा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडेल आणि आम्हाला आशा आहे की, ते नक्कीच या राइडचा आनंद घेऊ शकतील.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lalit prabhakar alok rajwade starter shantit kranti new marathi web series trailer release kpw

ताज्या बातम्या