Lata Mangeshkar Death Anniversary : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर यांना स्वर्गवासी होऊन आज एक वर्ष पूर्ण होतंय. आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला. लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या लतादीदींची आजही तितकीच लोकप्रिय आहेत. लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लतादीदींचा एक हसरा फोटो लावला आहे. त्याबरोबर त्यांनी एक मोठी पोस्ट लिहित त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
आणखी वाचा : Lata Mangeshkar Death Anniversary : लता मंगेशकर नेहमी पांढऱ्या रंगाची साडी का परिधान करायच्या? स्वत:च सांगितलेले कारण

राज ठाकरेंची पोस्ट

“दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील.

चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील.

दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे”

आणखी वाचा : लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ‘ते’ तीन वेदनादायक महिने, मृत्यूच्या दाढेतून परतल्या होत्या सुखरुप

दरम्यान राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांचे एकमेकांशी असलेले ऋणानुबंध राज्यभराला माहीत आहेत. त्यांचे फार घट्ट नातं होतं. लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये केली. त्यांनी त्या काळात ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. तर लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.