दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा चित्रपट मनोरंजन विश्वात सुरुवातीपासूनच चांगला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी ठरला होता. गेले अनेक महिने विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होते. देशातल्या विविध शहरात फिरून त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. परंतु इतके सगळे करूनही निर्माते आणि प्रेक्षक यांच्या अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट यशस्वी झाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयने नुकतीच मुंबईच्या मराठा मंदिर आणि गेटि गॅलक्सि या चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांची भेट घेतली. विजयने त्याच्या ‘लाइगर’ चित्रपटावर बहिष्काराचा ट्रेंड असताना ‘कौन रोकेंगे देख लेंगे’ (कोण अडवेल त्याला बघून घेऊ) या विधानानंतर काही दिवसांनी त्यांची भेट झाली. विजय देवकोंडा याच्या विधानानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं, विजय देसाई यांनी देखील त्याच्यावर टीका केली तसेच त्याला अहंकारी असे देखील म्हंटले होते.

“तू देवरकोंडा आहेस, अ‍ॅनाकोंडा नाही” असं म्हणत चित्रपटगृहाच्या मालकाची ‘लाइगर’वर आगपाखड

दोघांच्यात विधानाबद्दल चर्चा झाली. विजयने आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले, ‘मी देशासाठी चित्रपट करतो, मी देखील एक सर्वसामान्य घरातून आलेला आहे, हा चित्रपटासाठी मी तीन वर्ष मेहनत घेतली आहे. तुम्ही माझ्या स्वप्नांना कसे रोखू शकता? इतकेच मी म्हणालो होतो. माझं केवळ हे एक वाक्य व्हायरल करण्यात आले. मी खूप मनापासून बोलतो. तुम्ही जी टीका माझ्यावर केलीत त्यावर मला माझे बाबा म्हणाले मनोज देसाई साहेबांना भेटून ये. त्यांना समजावून सांग. जर मी काही चुकीचं वागलो मला माफ करा. मी प्रेक्षकांना कधीच कमी समजणार नाही’.

विजयने दिलेल्या स्पष्टीकरणाने मनोज देसाई देखील खुश झाले. मनोज देसाई यांनी विजयला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. विजयचा ‘लाइगर’ नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे, आमीर आणि अक्षयच्या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. एवढंच नाही तर आयएमडीबी या साईटवर सर्वात कमी रेटिंग मिळालेला भारतीय चित्रपट म्हणून ‘लाइगर’चं नाव समोर आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liger actor vijaya devrkonda meet maratha mandir theater owner manoj desai for apologies spg
First published on: 29-08-2022 at 12:39 IST