भारतातले सगळेच चित्रपटगृहांचे मालक सध्या चिंतेत आहेत. हिंदी चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद दिवसागणिक कमी होताना दिसत आहे. बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडमुळे सध्याच्या नवीन चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे. याचा परिणाम चित्रपटगृह तसेच मल्टीप्लेक्स मालकांच्या व्यवसायावर झाला आहे. लोकं चित्रपट बघायला येतच नसल्याने त्यांचा खर्च अवाच्यासवा वाढला आहे. आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर पाठोपाठ आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’सुद्धा सपशेल आपटला आहे. याबद्दलच मुंबईच्या मराठा मंदिर आणि गेटि गॅलक्सि या चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांनी याविषयी वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज देसाई यांच्यामते विजय देवरकोंडा या अभिनेत्याला अति आत्मविश्वास नडला आहे. मनोज देसाई यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणतात, “आमचा चित्रपट बॉयकॉट करा म्हणण्याचा अतिशहाणपणा ही आजचे कलाकार करत आहेत. त्याची फळं तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपसारख्या कलाकारांना मिळाली आहेत. या कलाकारांच्या अशा वक्तव्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होतो. विजय देवरकोंडा हा अभिनेतादेखील स्वतःला अ‍ॅनाकोंडा समजत असल्यासारखा बोलत आहे, बेताल वक्तव्य करत आहे. विजय याने दिलेली काही वक्तव्यं म्हणजे ‘विनाशकाले विपरीतबुद्धी’ असंच मला वाटतं.”

विजय देवरकोंडा याने मध्यंतरी प्रमोशन दरम्यान बॉयकॉटबद्दल एक वक्तव्य केलं होतं. यामध्ये तो म्हणाला की “ज्यांना चित्रपट बघायचा आहे ते बघतील आणि ज्यांना नसेल बघायचा ते बघणार नाहीत.” विजयच्या या वक्तव्यामुळे लाइगरला चांगलाच फटका बसल्याचं मनोज देसाई यांनी सांगितलं आहे. ते म्हणतात की विजयने आमीर खान, अक्षय कुमार, तापसी पन्नू यांच्याकडून काहीतरी शिकवण घ्यायला हवी. विजय देवरकोंडाची मग्रूरीच या चित्रपटासाठी घातक ठरू शकते, असंदेखील मनोज देसाई यांनी म्हंटलं आहे.

आणखी वाचा : Liger Movie Review : ना धड लायन, ना टायगर; जबरदस्ती जुळवून आणलेला अन् एक फिस्कटलेला प्रयोग म्हणजे ‘लाइगर’

‘लाइगर’ नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे, आमीर आणि अक्षयच्या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. एवढंच नाही तर आयएमडीबी या साईटवर सर्वात कमी रेटिंग मिळालेला भारतीय चित्रपट म्हणून ‘लाइगर’चं समोर आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais biggest theatre owner slams vijay devarkonda and his film liger avn
First published on: 28-08-2022 at 16:49 IST