मैत्री हा शब्द दिसायला खूप लहान दिसतो. परंतु, या एका नात्यात आपल्याला अनेक नाती मिळतात. त्यामुळे हे नातं जगात सगळ्यात अनमोल नातं असल्याचं म्हटलं जातं. त्यातच मैत्री म्हटलं की त्यात रुसवे-फुगवे, राग लोभ, मस्करी, प्रेम या सगळ्या गोष्टी आल्याच. अशीच काहीशी मैत्री ही विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांच्यात आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या मैत्रीत विशाखा कायम समीरवर दादागिरी करते असा गमतीशीर आरोप समीरने केला आहे.
दरम्यान, ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये रंगलेल्या या मुलाखतीत समीर आणि विशाखाने त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से शेअर केले. तसंच सेटवरचं एकंदरीत वातावरण कसं असतं हेदेखील त्यांनी सांगितलं.