चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज हे मनोरंजनाचं सध्याचं सर्वात मोठं साधन आहे. आता सिनेमा पाहण्यासाठी केवळ चित्रपटगृहात जाण्याची गरज नाही तर अगदी घरी बसून आपण सिनेमा पाहण्याची मजा लुटतोय. मात्र एक सिनेमा घडण्यामागे हजारो लोकांचे परिश्रम असतात. एक सिनेमा घडत असताना तो अनेक अडचणी पार करत टप्या टप्यातून जात असतो. त्यामुळे पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमाच्या मागे अनेक किस्से आणि रंजक कथा असतात. अशाच सिनेमाचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत.

या व्हिडीओ सीरिजमध्ये सर्वात आधी आम्ही तुमच्यासाठी पहिल्या वहिल्या भारतीय सिनेमाचे पडद्यामागेचे किस्से घेऊन आलो आहोत. चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादा साहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय सिनेसृष्टीचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो. १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र”या सिनेमाची निर्मिती केली. ज्या काळात चित्रपट निर्मितीचं तंत्रज्ञान विकसित नव्हतं त्याकाळी एका मराठी माणसाने सिनेमा तयार करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. यासाठी दादा साहेबांना अगदी लंडन ते वागंणीचं जंगल आणि मुंबईचा लेड लाईट एरियादेखील तुडवावा लागला होता. या पहिल्या भारतीय सिनेमाचे काही किस्से ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज