हिरव्यागार निसर्गाचा तजेला, सणासुदीची मौज आणि त्यानिमित्ताने एकत्र येणाऱ्या सुह्रदांबरोबर घालवलेला वेळ अशा आनंद सोहळ्याने भरलेल्या श्रावण महिन्यात पारंपरिक खेळांमधील गंमत ते चविष्ट पदार्थ सादर करण्यातलं कसब, सौंदर्य स्पर्धा हे सगळं एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी ‘लोकसत्ता श्रावणरंग’ या कार्यक्रमात मिळणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचा उत्साह वाढवायला चक्क ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकार उपस्थित राहणार आहेत.
श्रावण महिन्यातील पारंपरिक सणांचा गोडवा आणि त्यानिमित्ताने खेळले जाणारे मंगळागौरीसारखे खेळ, पारंपरिक पेहराव आणि दागदागिने घालून शाृंगार करण्यातला आनंद स्पर्धात्मक खेळांच्या माध्यमातून लुटण्याची संधी ‘लोकसत्ता श्रावणरंग’ या कार्यक्रमातून मिळणार आहे. १ ऑगस्टपासून ठाणे, दादर, वाशी, कल्याण, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा सहा विभागांमध्ये हा कार्यक्रम रंगणार असून या वेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकार उपस्थित राहून सहभागी स्पर्धकांबरोबर धमाल करणार आहेत. २०१८ पासून ‘सोनी मराठी’ वाहिनीवर दाखल झालेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अल्पावधीत राज्यभरात लोकप्रिय झाला. महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेता रणवीर सिंगसारख्या आजच्या पिढीतील कलाकारांनाही आवडणाऱ्या ‘हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक कलाकार आज घराघरात लोकप्रिय आहेत. समीर चौघुले, पृथ्विक प्रताप, चेतना भट, इशा डे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे, रोहित माने, रसिका वेंगुर्लेकर आणि निखिल बने ही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेली ‘हास्यजत्रे’तील कलाकार मंडळी ‘लोकसत्ता श्रावणरंग’च्या मंचावर उपस्थित राहणार आहेत.
पाककला स्पर्धा
‘श्रावणरंग’ कार्यक्रमात घेण्यात येणाऱ्या पाककला स्पर्धेसाठी कांदा – लसूण मसाला वापरून बनविलेला श्रावणातील पारंपरिक शाकाहारी पदार्थ सादर करता येईल. कांदा – लसूण मसाला वापरून पदार्थ बनवण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना ‘सुहाना स्पाईसेस’च्या वतीने विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय, या पाककला स्पर्धेत श्रावणातील पारंपरिक गोड पदार्थही सादर करता येणार आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्यांना भरघोस पारितोषिकांसह सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. स्पर्धेत सादर करण्यात येणाऱ्या पदार्थाचे नाव, वापरलेल्या साहित्याची यादी आणि बनविण्याची कृती एका कागदावर स्पष्टपणे लिहून आणणे अनिवार्य आहे. परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक असेल.
कला सादरीकरण…
या कार्यक्रमात होणाऱ्या मराठमोळा साजशृंगार स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील वैदर्भीय, कोकणी, मालवणी, मराठवाडी, बंजारा, कातकरी, आदिवासी, कोल्हापुरी, कोळी अशा विविध समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पेहराव आणि साजशृंगार करणे अपेक्षित आहे. कविता / एकपात्री सादरीकरण स्पर्धाही होणार असून त्यात जास्तीत जास्त दोन मिनिटांची कविता वा एकपात्री सादरीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी स्पर्धकांनी सादरीकरणाची ध्वनिचित्रफीत बनवून ९२६६९११४४९ या क्रमांकावर स्पर्धेच्या तारखेच्या आदल्या दिवशी सायं. ५ वाजेपर्यंत पाठवायची आहे.
या स्पर्धेत विनामूल्य सहभाग मिळवण्यासाठी दिलेला QR कोड स्कॅन करता येईल किंवा ९२६६९११४४९ या क्रमांकावर स. १० ते सायं. ६ या वेळेत संपर्क साधावा. ‘लोकसत्ता श्रावणरंग’मधील विविध स्पर्धांसाठी नियम व अटी लागू असतील.

●१२ ऑगस्ट – रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड स्टेशन रोड, चिंचवड गाव, पिंपरी चिंचवड – चेतना भट, रोहित माने
●२० ऑगस्ट – पुण्याई सभागृह, बँक्वेट, १२७ – १ ए, पौड रोड, महागणेश कॉलनी, कोथरूड, पुणे – समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर
कार्यक्रमांची ठिकाणे
सोनी मराठीवरील ‘आज काय बनवू या? मधुरा स्पेशल’मध्ये झळकण्याची संधी
‘श्रावणरंग’ अंतर्गत सहा विभागांमध्ये होणाऱ्या पाककला स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांच्या ध्वनिचित्रफिती ‘सोनी मराठी’ वाहिनीला परीक्षणासाठी पाठवण्यात येणार आहेत. प्रसिद्ध शेफ मधुरा बाचल या सर्व ध्वनिचित्रफिती पाहून ज्या विजेत्या महिलेची निवड करतील.
तिला सोनी मराठीवरील ‘आज काय बनवू या? – मधुरा स्पेशल’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
मुख्य प्रायोजक
सुहाना अंबारी मसाले
सहप्रस्तुती
निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड
सहप्रायोजक
सोनी मराठी, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड , पितांबरी रुचियाना, सोसायटी टी, एम.के.घारे ज्वेलर्स, ब्रह्मविद्या साधक संघ, रिजन्सी ग्रुप, युनियन बँक ऑफ इंडिया
पॉवर्ड बाय
वीणा वर्ल्ड , सत्यम फूड्स
गिफ्ट पार्टनर
कलानिधी, इवाज नेल स्टुडिओ
इव्हेंट पार्टनर
पिंपरी चिंचवड इव्हेंट पार्टनर -आपला आवाज आपली सखी पुणे इव्हेंट पार्टनर – सयोग वंडर कार्ड