मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘चांदनी बार’ या सिनेमाला रिलीज होवून आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. तब्बू आणि मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा चांगलाच लोकप्रिय ठरला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मधुर भांडाकर यांनी या सिनेमाविषयी सांगताना हा सिनेमा खूपच कमी बजेटमध्ये बनवल्याचं सांगितलं. यावेळी या सिनेमाच्या संपूर्ण बजेटपेक्षा जास्त खर्च तर ‘हिरोईन’ सिनेमातील करीनाच्या कपड्यांवर झाल्याचं ते विनोदात म्हणाले.

एका मुलाखतीमध्ये मधुर भंडारकर म्हणाले, “हे खूप जोखमीचे होते. लोकांना सिनेमाच्या नावाबद्दल देखील अडचण होती. अनेकांना हा सिनेमा अत्यंत खालच्या दर्जाचा आणि बी ग्रेड असल्याचं वाटलं. मी जवळपास सहा महिने या सिनेमावर संशोधन केलं होतं.”असं भंडारकर म्हणाले. तसचं निर्मात्यांना या सिनेमात एक ऑयटम साँग टाकण्याची मागणी केली होती असं त्यांनी सांगितलं. “माझा पहिला सिनेमा चालला नाही, त्यामुळे माझ्यावर खूप दडपण होतं, मात्र मला हवा तसाच सिनेमा बनवण्यावर मी ठाम होतो. मी अगदी कमी बजेटमध्ये सिनेमा बनवला आहे.” असं भांडारकर म्हणाले.

नीरज चोप्राने केलं शक्ती मोहनला प्रपोज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

भरत जाधवच्या नावाखाली होत होती फसवणूक, पोस्ट शेअर करत अभिनेत्याने केलं सावध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे एक विनोदी किस्सा सांगताना मधुर भांडारकर म्हणाले, “या सिनेमाचं बजेट इतकं कमी होतं की मी करीनाला एकदा विनोदात म्हणालो, मी चांदनी बार एवढ्या कमी बजेटमध्ये बनवला आहे की त्याहून जास्त मी हिरोईन सिनेमातील तुझ्या कपड्यांवर खर्च केले आहेत.” मधुर भांडारकर यांनी अवघ्या दीड कोटी रुपयांमध्ये ‘चांदनी बार’ सिनेमा बनवला आहे. तर त्याहून जास्त खर्च ‘हिरोईन’ सिनेमातील करीनाच्या कपड्यांवर झालाय.

‘चांदनी बार’ या सिनेमाला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. तर या सिनेमानंतर वास्तववादी सिनेमा निर्माण करणारे फिल्ममेकर म्हणून मधुर भांडारकर यांची ओळख निर्माण झाली. मधुर भांडाकर यांचे ‘पेज ३’, ‘फॅशन’, ‘कॉर्पोरेट’ हे सिनेमा चांगलेच गाजले.