अभिनेत्री वनिता खरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आली. वनिताने फक्त मराठी कार्यक्रम, चित्रपटांमध्येच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. तिच्या विनोदी शैलीचे तर हजारो चाहते आहेत. आता वनिता एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेमध्ये वनिताची एण्ट्री झाली आहे.

आणखी वाचा – “महिलांवर घाणेरड्या, अश्लिल कमेंट करण्यासाठी…”; उर्मिला मातोंडकर यांचा राग अनावर

‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. वनिता या मालिकेमध्ये रंजना हे पात्र साकारताना दिसणार आहे. वनिताची कधीही न पाहिलेली भूमिका यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तिच्या या पात्राची खासियत म्हणजे वनिता मालवणी भाषेमध्ये बोलताना दिसेल. तिच्यासाठी मालवणी भाषेमध्ये संवाद साधणं आव्हानात्मक होतं. पण सहकलाकारांच्या जोडीने वनिताने तिची भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

वनिता साकारत असलेलं पात्र म्हणजेच रंजना छोटीशी खानावळ चालवत असते. वडिलांचा शोध घेत असलेल्या स्वरासोबत तिची भेट होते आणि काही काळासाठी ती तिला आपल्या खानावळीमध्ये आसरा देते. इतरवेळी प्रेक्षकांना खळखळून हसवणारी वनिता या पात्रामध्ये एका वेगळ्या लूकमधून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. वनिताचा या मालिकेमधील लूकदेखील समोर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बिनधास्त मुलगी वनिता खरातचे आजवरचे सर्वात बोल्ड लूक

मालिकेमध्ये स्वराची भूमिका साकारणाऱ्या अवनीबरोबर देखील वनिताची मैत्री झाली आहे. वनितालाही या मालिकेमध्ये काम करत असताना खूप मज्जा आली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे वनिताच्या चाहत्यावर्गामध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. आपल्या कामामुळे चर्चेत असलेली वनिता तिच्या बोल्ड लूकमुळेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.