दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असणाऱ्या महेश बाबूच्या इन्स्टाग्राम पोस्ट किंवा ट्वीट अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या महेश बाबू त्याची पत्नी नम्रता शिरोडकर आणि मुलांसोबत न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. पण अशात या महेश आणि नम्रता यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. ज्यात हे दोघंही बिल गेट्स यांच्यासोबत दिसत आहेत.

न्यूयॉर्क व्हेकेशनला गेलेले नम्रता आणि महेश बाबू सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. दोघंही सातत्याने या ट्रीपचे अपडेट आणि फोटो सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करताना दिसत आहेत. नुकताच महेश बाबूनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकर बिल गेट्स यांच्यासोबत पोझ देताना दिसत आहेत.

आणखी वाचा- “एवढा गर्व कोणत्या गोष्टीचा…” अल्लू अर्जुनचं वागणं पाहून भडकले लोक

महेश बाबूनं हा फोटो शेअर करताना लिहिलं, “मिस्टर बिल गेट्स यांना भेटण्याची संधी मिळाली. खूपच शांत व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्यासारखी महत्त्वाकांक्षी व्यक्ती क्वचितच कोणी असेल. ते खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.” महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांचा बिल गेट्स यांच्यासोबत हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. याशिवाय नम्रता आणि महेश बाबू यांनी त्याच्या या ट्रीपचे देखील बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अलिकडच्या काळात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीच्या वादात महेश बाबू सोशल मीडियावर बराच चर्चेत होता. त्याने बॉलिवूडला मी परवडणार नाही असं म्हटल्यानंतर देशभरातून त्याच्या या वक्तव्यांवर प्रतिक्रिया आल्या होत्या. महेश बाबूच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात एस एस राजामौली यांच्या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असून चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.