बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नम्रता शिरोडकरचा जन्म मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. तिचे संपूर्ण शिक्षण आणि तिचे बालपण हे मुंबईत गेले आहे. नम्रताने दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता महेश बाबूबरोबर लग्न केल्यानंतर ती हैदराबादमध्ये स्थायिक झाली. पण तिची महाराष्ट्राबद्दलची ओढ अद्याप कायम आहे. नुकतंच नम्रताने तिच्या दोन्हीही मुलांसह शिर्डी साईबाबा संस्थानला भेट दिली.

नम्रता शिरोडकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नम्रताने यंदाचा मातृदिन फारच खास पद्धतीने साजरा केला. नम्रताने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यातील एका फोटोत ती तिच्या कुटुंबाबरोबर शिर्डीतील विमानतळावर चालत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने तिच्या मुलांसह शिर्डी साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर आल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : महेश बाबूला मराठीत बोलता येते का? नम्रता शिरोडकर म्हणालेली, “तेलुगू भाषा…”

namrata shirodkar
नम्रता शिरोडकर पोस्ट

यातील एका फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “अखेर मी माझ्या मूळ भूमीवर पाऊल ठेवले”, असे कॅप्शन नम्रताने या फोटोला दिले आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने शिर्डी आणि परत.. यंदाचा मातृदिन अनोख्या पद्धतीने साजरा झाला, असे म्हटले आहे.

namrata shirodkar 1
नम्रता शिरोडकर पोस्ट

आणखी वाचा : “महेश आयुष्यात आला आणि…” अखेर नम्रता शिरोडकरने सांगितले चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नम्रता शिरोडकर १९९३ मध्ये मिस इंडियाचा ताज जिंकल्यानंतर पहिल्यांदाच प्रसिद्धीझोतात आली. मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धत ती सहाव्या स्थानावर होती. त्यानंतर काही वर्षांनी तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता महेश बाबूबरोबर लग्न केल्यानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम केला. पण तरीही ती कायमच चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.