आजकाल सोशल मीडियावर स्टार किड्स सतत चर्चेत असते. यामध्ये अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूरचा मुलगा तैमुर, अभिनेत्री सोहा अली खानची मुलगी इनाया, अभिनेता सलमान खानचा भाचा आहिल अशा अनेक स्टार किड्सचा समोवश आहे. यामध्ये मराठी स्टार किडचा देखील मागे नाहीत. यामधील एक नाव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमधील एक अतिशय लोकप्रिय अभिनेते महेश कोठारे यांची नात जिजा कोठारे. जिजाचे फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच जिजाचा ‘झपाटलेला’ चित्रपटातील एक डायलॉग बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जिजाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिजा ‘झपाटलेला’ हा चित्रपट आजोबांसोबत पाहत असल्याचे दिसत आहे. दरम्यान चित्रपटातील डायलॉग जिजा बोलताना दिसत आहे.
उर्मिलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जिजा आजोबा महेश कोठारे यांच्यासोबत बसून ‘झपाटलेला’ हा चित्रपट पाहत आहे. दरम्यान ती चित्रपटातील डॉयलॉग बोलते आहे. ‘तुझा जीव माझ्यात माझा जीव तुझ्यात. ओम फट स्वाहा’ असे जिजा अतिशय गोड आवाजात बोलताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर जिजाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेत आहे.