Akshay Kumar Returns To Ramp Walks After 12 Years : इंडस्ट्रीमध्ये फिटनेस, अभिनय व शिस्तीसाठी ओळखला जाणारा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार १२ वर्षांनी रॅम्प वॉक करताना दिसला. यापूर्वी अक्षय कुमारने वेगवेगळ्या डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. आता १२ वर्षांनी त्याने फाल्गुनी शेन पीकॉकसाठी रॅम्प वॉक केला आहे.

अक्षयच्या या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हातात पानांनी भरलेली फांदी घेऊन चालताना दिसत आहे. अक्षय कुमारच्या या लूकचे खूप कौतुक केले जात आहे; परंतु काही लोक तो पानांनी भरलेली फांदी घेऊन दिसल्यामुळे त्याला ट्रोलही करीत आहेत.

शुक्रवारी (२५ जुलै) डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केल्यानंतर, अक्षयने शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मीडियाशी थोडक्यात संवाद साधला आणि त्याच्या नेहमीच्या झोपण्याच्या वेळेनंतर शो बंद केल्याबद्दल विनोद केला. तो म्हणाला, “ठीक आहे, तुमचे खूप खूप आभार. मी हिंदीमध्ये बोलणार. तुम्हा सर्वांचे, इथे आलेल्या सर्व लोकांचे आणि माध्यमांचे खूप खूप आभार. (त्याच्या घड्याळाकडे बघत) खूप उशीर झाला आहे ना?

अक्षयने विनोद केला, ज्यामुळे मीडियातील सदस्यांमध्ये गोंधळ उडाला. अभिनेता चांगल्या मूडमध्ये होता. जेव्हा एका फोटोग्राफरने, “दिल्ली में चलता है सर”, असे म्हटले. तेव्हा अक्षयने विनोदाने उत्तर दिले, “तभी हाल देख तेरा.”

या वर्षी फॅशन शोची थीम महाराजा आणि महाराण्यांच्या भव्यतेवर आधारित होती. डिझायनर फाल्गुनी शेन पीकॉक यांनी लक्ष्मी विलास पॅलेस आणि सिटी पॅलेस जयपूरसारख्या वारशाने प्रेरित कलेक्शन सादर केले, ज्यामध्ये शाही भरतकाम, मखमली पोत व जरीकाम यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

लोक अक्षयच्या रॉयल इंडियन लूकवर फिदा

रॅम्प वॉकवर अक्षय कुमार रॉयल इंडियन लूकमध्ये दिसला. अक्षय कुमार आयव्हरी शेरवानीमध्ये दिसला. त्याने काळ्या सनग्लासेस आणि त्याबरोबर सिल्व्हर शूज घातले होते. अक्षयचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“खरं तर खूप दिवसांनी मी रॅम्प वॉक करीत आहे. मला आठवतंय की, जवळजवळ १२ वर्षांपूर्वी मी एकदा रॅम्पवर चाललो होतो. मी ते ‘या’ लोकांबरोबर केले होते आणि हे करणे सन्मानाची गोष्ट आहे.” अक्षयने डिझायनर्स, मॉडेल्स आणि संपूर्ण टीमचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल कौतुक केले.

तो पुढे म्हणाला, “मी त्याचा प्रत्येक भाग एन्जॉय केला आहे. विशेषतः मी पाहिले आहे की, एक शो आयोजित करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. लोक खूप चांगले कपडे घालून येतात आणि २५ मिनिटांत संपूर्ण शो संपतो. पण, मी तुम्हाला फक्त एवढेच सांगू इच्छितो की, शेन आणि फाल्गुनी ज्या पद्धतीने स्वतःला आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करतात. त्यामुळे मला वाटते की, त्यांनी भारताला खूप अभिमानास्पद काम केले आहे.”

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अक्षय लवकरच प्रियदर्शनच्या ‘भूत बंगला’ चित्रपटात दिसणार आहे. ‘हैवान’ व ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांमध्येही तो दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.