‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय या गोष्टींमुळे मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील अनेक रंजक वळणं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि ही मालिका नुकतीच एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी या मालिकेत पाहिलं कि यश आणि नेहा एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात.

होळीचा सण जवळ आला आहे आणि या मालिकेत गुलाबी रंगाची होळी साजरी होणार आहे कारण या होळीमध्ये फुलणार आहे यश आणि नेहामधील प्रेम. नेहा, यश आणि परी एकमेकांसोबत पहिल्यांदा होळीचा सण एकत्र साजरा करणार आहेत. त्यामध्ये यश नेहाला तिचं आयुष्य रंगांनी भरून टाकणार असं काबुल करतो, त्यामुळे त्यांच्या या प्रेमकथेला धुळवडीचाही रंग चढताना प्रेक्षक पाहू शकतील.

आणखी वाचा- प्रभासच्या ‘राधे श्याम’वर The Kashmir Files पडला भारी, तिसऱ्या दिवशी चित्रपटानं केली एवढी कमाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांनी या मालिकेच्या निमित्तानं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. फारच कमी कालावधीत या मालिकेनं प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. प्रार्थना आणि श्रेयस यांची जोडी तर छोट्या पडद्यावर गाजताना दिसत आहे. एवढंच नाही तर परी म्हणजेच मायरा हिचाही अभिनय सर्वांची मनं जिंकून घेतो.