दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ या त्याच्या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा’ या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यांवर अनेक रील व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अल्लू अर्जुनचे भारतात लाखो चाहते आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता बराच काळ गेला असला तरी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात अजूनही या गाण्याने घरं केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत परीची भूमिका साकारणारी मायराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला मामी आणि परी श्रीवल्लीटी स्टेप करताना दिसते. त्यानंतर त्यांची भन्नाट मस्ती पाहायला मिळते. हा व्हिडीओ शेअर करत “कालचा एपिसोड बघुन खुप वाईट वाटले असेल ना म्हणून हा BTS व्हिडीओ शेअर केला. हा सीन करताना मामी आणि परी ने खूप धम्माल केली.”

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : “हास्यजत्रेच्या तिसऱ्या एपिसोडच्या शूटच्यावेळी प्रेग्नेंसी विषयी कळले आणि…”, नम्रता संभेरावने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पुष्पा’ या चित्रपटातील गाण्यांवर आधी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या मुलींचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तर त्यानंतर विराट कोहलीचा क्रिकेटच्या मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. एवढंच काय तर बॉलिवूडमधील इतर अनेक कलाकारांनी यावर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाने सगळ्यांनाच वेड लावलं असं म्हणायला हरकत नाही. ‘पुष्पा’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली आहे.