दुल्कर सलमानप्रतीचं वेड चाहत्याच्या जीवावर बेतलं

दुल्करला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. यात हरीही होता. मात्र हरीच्या अचानक छातीत दुखू लागले आणि तो खाली कोळसला.

अभिनेता दुल्कर सलमान याला पाहण्यासाठी दुरून आलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. दुल्कर कोल्लममधील एका मॉलच्या उद्घाटन समारंभासाठी आला होता. दक्षिणेतल्या या प्रसिद्ध स्टारची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते जमले होते याचवेळी त्याला पाहण्यासाठी आलेल्या हरीचा मृत्यू झाला.

हरी तिरुवनंतपुरम् येथून आला होता. मॉलच्या उद्घाटनासाठी आलेल्या दुल्करला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. यात हरीही होता. मात्र हरीच्या अचानक छातीत दुखू लागले तो खाली कोळसला त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यापूर्वीच त्याला मृत घोषीत करण्यात आलं होतं.

काही स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली त्यामुळे त्याचा जीव गेला. मात्र पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तर दुसरीकडे मॉलच्या मालकावर लोकांचा जीव धोक्यात घातल्या प्रकरणी, सुरक्षेची योग्य उपाययोजना न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man dies at dulquer salmaan event in kerala