बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी ही चित्रपटसृष्टी सक्रिय नसली तरी ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मंदिरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या मंदिरा बेदी ही थायलंडमध्ये तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. यावेळी मंदिराने तिचे बिकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

मंदिराने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त मंदिराने पूलमधले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मंदिराने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तर तिचा मित्र हा शर्टलेस आहे. यावेळी फोटो शेअर करत मंदिरा म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा आदि. तू माझ्यासाठी काय आहेस हे सर्व काही फोटोमधून दिसते. आपण एकमेकांना किती वर्षांपासून ओळखतो, दोघांमधील समन्वय काय असतं आणि मी तुझ्यावर किती विश्वास ठेवते. देव तुला खूप आनंदी ठेवो आणि तू खूप यशस्वी होवो. वयाच्या १७ व्या वर्षापासून तू माझा मित्र आहेस.”

आणखी वाचा : “माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवले”, अभिनेत्रीने केला शत्रुघ्न सिन्हांवर आरोप

आणखी वाचा : “मी एका कपलसोबत ‘Throuple Relationship’मध्ये होते”; सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांपूर्वीच मंदिराचे पती राज कौशल यांचे निधन झाल्यानंतर तिचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. ट्रोल होत असल्याचे पाहिल्यानंतर मंदिराने कमेंट सेक्शन बंद केले.