अभिनेत्री मंदिर बेदीवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला होता. 30 जून रोजी पहाटे ४.३० वाजता राज कौशल यांनी अखेरचा श्वास घेतला. मंदिराचे पती आणि बॉलिवूड फिल्ममेकर राज कौशल यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या दु:खातून मंदिरा आता हळूहळू सावरत आहे. मंदीरा तिची आणि तिच्या परिवाराची कळजी घेताना दिसत आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आज मंदीराची धाकटी मुलगी तराचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मंदिराने इन्स्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले आहेत.

बुधवारी मंदिराने तिची मुलगी, मुलगा आणि दिवंगत पती राज कौशलसोबत फोटो शेअर करत मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. मंदिराने हा फोटो शेअर करत, “तरा… आज २८ जुलै, तू आमच्या आयुष्यात येऊन आज बरोबर एक वर्ष झालं….आणि म्हणून आपण आजचा दिवस साजरा करतो आहे. बाळा (तरा) आज तुझा ५ वा वाढदिवस आहे. आय लव्ह यू #beginagain.” असे कॅप्शन दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

मंदिरा आणि राज कौशलने मागीच्या वर्षी याच दिवशी तराला दत्तक घेतलं होत आणि आता मंदिरा तिचा वाढदिवस साजरा करताना दिसली. तराच्या वाढदिवसानिमित मंदिराच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच बॉलिवूड विश्वातील कलाकारांनी देखील तरावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
marnira-bedi-daughter-birthday
Photo- Mandira Bedi Instagram

दरम्यान पतीच्या निधनानंतर मंदिराला तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. मंदिराने अनेक वर्षाची परंपरा मोडत पतीच्या अंतिम संस्काराचे विधी पार पडले होते. यामुळे अनेक युजर्सने तिचे कौतुक केले, तर काही युजर्सने तिला ट्रोल देखील केले होते. तसंच मंदिराने पतीच्या अंत्यविधीसाठी जीन्स पॅन्ट परिधान केल्याने देखील नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. या नेटकऱ्यांचा सोना मोहपात्राने चांगलाच समाचार  घेतला.