बॉलिवूड चित्रपटांच्या संवादात होणारी भाषेची सरमिसळ हा कायम चर्चेचा मुद्दा राहिला आहे. शिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतले सगळेच कलाकार हे हिंदी व्यतिरिक्त केवळ इंग्रजीतच संवाद साधतात असाही आरोप बऱ्याचदा केला जातो. याच मुद्द्यावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी यांनी त्यांचं मत मांडलं आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट ही देवनागरी मध्येच असावी असा मनोज आग्रह धरतात.

याविषयी मनोज म्हणाले, “यामध्ये मनोरंजनसृष्टीचा दोष नाही. सध्या आपल्यापैकी सगळ्यांनाच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवायचं आहे. त्यांनी प्रथम इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावं असं आपल्याला वाटतं आणि नंतर त्यांनी इतर भाषांकडे लक्ष द्यावं असं आपलं म्हणणं असतं. त्यामुळे एक पालक म्हणून आपण अयशस्वी ठरतो.”

आणखी वाचा : “म्हणून मी तिला कॉफी विथ करणमध्ये …” तापसी पन्नूच्या ‘त्या’ वक्तव्यावर करण जोहरने दिलं उत्तर

एका पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यादरम्यान मनोज यांनी यावर भाष्य केलं आहे. पुढे मनोज म्हणाले, “आपल्या मुलांमध्ये मातृभाषेबद्दल आपुलकी निर्मान करण्यात एक शिक्षक म्हणूनही आपण अपयशी ठरलो आहोत. मनोरंजनसृष्टी आणि समाज यांच्यात फारसा फरक नाही. या क्षेत्रात येणारे ९० ते ९५% कलाकार हे फक्त इंग्रजीमध्येच लिहितात. हे खूप दुर्दैवी आहे. इंडस्ट्रीमधील बरेच कमी कलाकार देवनागरीमध्ये स्क्रिप्टची मागणी करतात. मी स्वतः देवनागरीमध्ये लिहिलेल्या स्क्रिप्टच वाचतो, इंग्रजीतील स्क्रिप्टला मी थेट नकार देतो.”

View this post on Instagram

A post shared by RAWINDRRA (@krishkhatriofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज बाजपेयी हे त्यांच्या वेगळ्या भूमिकांसाठी लोकप्रिय आहेत. त्यांची ‘फॅमिली मॅन’ ही सीरिज चांगलीच गाजली. आता मनोज पुन्हा ‘सूप’ या नव्या वेबसीरिजमधून वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये मनोज यांच्याबरोबर कोंकणा सेन शर्मा, नासर, सैयाजी शिंदे असे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.