सध्या मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘टकाटक’. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला टकाटक या चित्रपटातील बोल्ड दृश्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. ‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टकाटक २ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे पोस्टर, टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यासोबतच ‘टकाटक २’चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेता अजिंक्य राऊत एका हटके भूमिकेत दिसणार आहे. त्यावरुन त्याच्यावर टीका केली जात आहे.

टकाटक २ या चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य पाहायला मिळत आहे. यातील संवादही थोडे बोल्ड असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजिंक्य राऊतवर टीका केली जात आहे. मात्र अजिंक्य राऊतचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे तो त्यासाठी फारच खास आहे. नुकतंच त्याने हा चित्रपट करण्यामागचे कारणही सांगितले आहे. तसेच त्याला या चित्रपटात ऑफर कशी मिळाली याबद्दलही सांगितले आहे.
“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू

सध्या अजिंक्य हा ‘टकाटक २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी एका मुलाखतीत त्याला हा चित्रपट का कसा मिळाला? याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, “टकाटक २ हा चित्रपट माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मी विठू माऊली ही मालिका केली होती. ती मालिका संपल्यानंतर मी परभणीला माझ्या गावी निघून गेलो. पण तिकडे असतानाही इथे नवनवीन भूमिकांसाठी ऑडिशन देणे सुरुच होते. यादरम्यान करोनाचा प्रादुर्भाव वाढला. लॉकडाऊन झालं.”

“करोना काळात मला एका हिंदी प्रोजेक्टसाठी ऑडिशन असल्याचं कळालं. करोनाचा धोका कमी झाल्यावर अजिंक्य परभणीहून मुंबईला हिंदी ऑडिशनसाठी आला. पण त्या हिंदी मालिकेसाठी अजिंक्यची निवड झाली नाही. त्यामुळे पुन्हा परभणीला परत जाण्याच्या विचारात असतानाच त्याला ‘टकाटक २’ या चित्रपटासाठी विचारण्यात आले. या चित्रपटातील शरदच्या भूमिकेसाठी त्याला विचारणा करण्यात आली. एकीकडे लॉकडाऊनमुळे एकही संधी मिळत नव्हती. त्यातच ही ऑफर आल्याने अजिंक्यने होकार दिला आणि ‘टकाटक २’ चित्रपटाला शरद म्हणजेच शऱ्या मिळाला.”

‘मन उडू उडू झालं’ मालिकेत हृतासोबत झळकणाऱ्या अभिनेत्याबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Valmik Raut (@ajinkyathoughts)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टकाटक २’ चित्रपटातील बोल्ड दृश्य त्यातील संवाद यावर खूप मेहनत करावी लागली. मी यापूर्वी केलेली विठू माऊली ही एका वेगळ्या धाटणीची होती आणि त्यानंतर पहिल्याच चित्रपटातील बोल्ड संवाद असलेला रोल करताना मनावर थोडं दडपण होतं. पण या चित्रपटाच्या टीमने खूप सहकार्य केले. एखादी इमेज ब्रेक करण्याची किंवा कलाकार म्हणून नवे प्रयोग करण्याची संधी मला ‘टकाटक २’ ने दिली, असेही अजिंक्य म्हणाला.