लॉकडाऊन चित्रपटसृष्टीमधील मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यामुळे कामापासून दूर राहिल्यामुळे कलाकारांना सुद्धा घरात बसून कंटाळा आला होता. पण आता सरकारने चित्रीकरणास परवानगी दिली आहे. तसेच त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहे. पुन्हा सेटवर काम करायला मिळणार, म्हणून कलाकार मंडळी खुश झाल्याचे दिसत आहे. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ म्हणजेच, आपला सगळ्यांचा लाडका अभिनेता देवदत्त नागे हादेखील पुन्हा चित्रीकरण करण्यास उत्सुक असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आणि त्यांच्या लाडक्या मालिका त्यांना पाहायला मिळणार, याचा जितका आनंद प्रेक्षकांना झाला आहे, तेवढाच तो कलाकार मंडळींना सुद्धा झाला आहे. जे काम १०० जणांच्या युनिटमध्ये करण्यात येत होते, ते यापुढे २० ते २५ जणांच्या युनिटला घेऊन पूर्ण करावे लागणार आहे. हे सर्व आव्हानात्मक असले तरीदेखील सगळ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. कलाकारांना पुन्हा टीव्हीवर पाहायला मिळणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरू होत असल्याने, अभिनेता देवदत्त नागे यालाही आनंद झाला आहे. “चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार मानतो. चित्रिकरणापासून आम्ही कलाकार मंडळी बरेच दिवस दूर आहोत. ‘लाईट्स कॅमेरा ऍक्शन’ हे शब्द पुन्हा ऐकायला मिळणार आहेत, याचा आनंद आहे.” असे तो म्हणाला.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार मुंबईमध्ये या महिन्यात चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. पण यामध्ये वयाने १० वर्षांपेक्षा लहान मुले आणि ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. हा नियम करोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती सामान्य होईपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे आता निर्मात्यांसमोर मोठे आव्हान आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor devdatta nage is very excited to resume shooting avb
First published on: 16-06-2020 at 19:33 IST