मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत अनेक वर्ष काम प्रशांत दामले देखील भावूक आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भावूक पोस्ट लिहिली आहे .

प्रशांत दामले हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते टीव्ही, नाटकाच्या जगतात प्रसिद्ध आहेत, तितकेच आपल्या खुमासदार पोस्टमुळे प्रसिद्ध आहेत. नुकतंच त्यांनी प्रदीप पटवर्धन यांच्याबद्दल फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत प्रदीप पटवर्धन यांचा फोटोही शेअर केला आहे.

Pradeep Patwardhan Passes Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

प्रशांत दामले यांची पोस्ट

“पट्या… प्रदीप पटवर्धन…

मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या… सिद्धार्थ कॉलेज ची 5 वर्ष (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती. ही घानिष्ठ मैत्रीला आज पूर्ण विराम मिळाला. मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे.

पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार…”, असे प्रशांत दामलेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

३८ वर्षांची मैत्री, बँकमध्ये नोकरी अन्…; प्रदीप पटवर्धन यांच्याबद्दल बोलताना विजय पाटकर भावूक

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी सिनेमात जसे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही जोडगोळी प्रसिद्ध होती तशी नाटकांमध्ये प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन ही जोडगळी प्रसिद्ध होती. दोघांच्यात विनोदाचे टायमिंग उत्तम होते म्हणून प्रेक्षकांना त्यांची जोडी आवडत असे. प्रदीप पटवर्धन यांचे जाणे केवळ नाट्यसृष्टीला नव्हे तर त्यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांना देखील हा धक्का आहे.