मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणून अभिनेता प्रसाद ओकला ओळखले जाते. अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणारा प्रसाद ओक सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रसाद ओक याची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसाद ओकने ही पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “बाबा जाऊ नको दूर…”, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री सायली संजीवची भावनिक पोस्ट

प्रसाद ओकने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या या टी-शर्टवर लढ असे लिहिलेले आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. या फोटोला कॅप्शन देताना प्रसाद ओक म्हणाला, आता कोणताही व्हायरस आला, कशीही परिस्थिती आली, तरी स्वतःला..कुटुंबाला.. आणि जवळच्या प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं… “लढ”, अशा आशयची पोस्ट त्याने शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक, अभिनेता, गायक, सूत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओकने अभिनयाची छाप सोडली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या नाटकासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. श्रीराम लागू, निळु फुले या सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत प्रसादला काम करण्याची संधी मिळाली. अधिकारी ब्रदर्सच्या बंदिनी या मालिकेतून प्रसाद ओकला छोटया पडद्यावर पदार्पणाची पहिली संधी मिळाली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपट, मालिकेत काम केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने ‘धुरळा’, ‘हिरकणी’, ‘ये रे ये रे पैसा २’, ‘फर्जंद’ अशा अनेक मराठी चित्रपटांमुळे तो प्रसिद्धी झोतात आला. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. हिरकणी या चित्रपटाची निर्मिती प्रसादने केली होती.