ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी(१८ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ त्यांनी गाजवला होता. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्याचबरोबरीने त्यांच्या जवळच्या कलाकरांना हा धक्का बसला आहे. हिंदीच नव्हे तर मराठी कलाकारांनीदेखील त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मराठीतले सुप्रसिद्ध कलाकार सचिन पिळगावकर यांनी तबस्सूम यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. ते असं पोस्टमध्ये म्हणालेत “तबस्सूमजी या हिंदी चित्रपटातील माझ्या पहिल्या आई आहेत. ‘झिम्बो का बेटा’ हा माझा पहिला हिंदी चित्रपट ज्यात मी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्या माझ्या आई होत्या त्यांच्याबद्दल अनेक आठवणी आहेत. त्या एक अद्भुत व्यक्ती होत्या. मी त्यांना कायमच मिस करेन. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.” त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तबस्सूम यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘नर्गिस’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर ‘बैजू बावरा’ चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सुत्रसंचालन केले होते.