झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आता लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेत येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे हे दोघे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यासोबतच परीची भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळलाही विशेष पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील समीर हे पात्र साकारत असलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नुकताच या मालिकेतला शेवटचा चित्रित केला. त्याने या संदर्भातील भावुक पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षण कऱ्हाडे या मालिकेत श्रेयस तळपदे मित्राची भूमिका करत होता. श्रेयस आणि संकर्षण हे दोघे लहानपणापासूनचे मित्र दाखवले गेले आहेत. दोघांच्यातील मित्राचे नाते फार सुंदररित्या दाखवले होते. संकर्षणने साकारलेले पात्र हसमुख, विनोदी स्वभावाचे आणि मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे ते पात्र होते. संकर्षणने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे ‘बायबाय यश समीर काल आम्ही यश आणि समीर म्हणून माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतला शेवटचा सीन शूट केला मला माझ्या मित्राची, यशाची माझ्या पात्राची, समीरची आणि त्यांच्या अफलातून मैत्रीची कायम आठवण येत राहील’.

‘या’ कारणासाठी अबू सालेमच्या सांगण्यावरून दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता

संकर्षण कऱ्हाडे मराठी सिनेसृष्टीतील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, नाटक, मालिका, निवेदन अशा गोष्टींमध्ये संकर्षण कऱ्हाडे आपल्याला दिसून येतो. त्याच्या कवितांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या तो तू म्हणशील तस या नाटकामध्ये व्यस्त आहे. संकर्षण कऱ्हाडेसोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. नुकताच त्याने आपल्या आगामी ‘फोर ब्लाइंड मॅन’ या वेबसिरीजचा प्रोमो सोशल मीडियावर टाकला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकताच झी मराठीवर एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होत आहे. ‘दार उघड बये’ असे या मालिकेचे नाव आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. दररोज रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यामुळेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे. यानंतर या मालिकेच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी ही मालिका बंद करु नये, अशा कमेंटही केल्या आहेत.