‘फुलपाखरू’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा नुकताच वाढदिवस झाला. ऋताला अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा दिल्या. लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस ऋताने पती प्रतीक शाहसह साजरा केला. याचे फोटोही तिने शेअर केले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी ऋताला एक खास गिफ्ट मिळालं आहे. ऋताने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

ऋता लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ऋताने चाहत्यांना हा सुखद धक्का दिला आहे. “मोठ्या पडद्यावरील पुढील उपक्रमाची घोषणा करत आहे. उंच आकाशात उडायचं तर हवी मैत्रीची, प्रेमाची, जिद्दीची कन्नी”, असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे. पुढे तिने “यापेक्षा छान गिफ्ट काय असू शकतं” म्हणत चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत. ‘कन्नी’ असं तिच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. २०२३ मध्ये ऋताचा हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही पाहा >> Photos : लग्नानंतरचा पहिला वाढदिवस पतीसह साजरा करतेय ऋता दुर्गुळे; शेअर केले खास फोटो

‘कन्नी’ चित्रपटाच्या निमित्ताने ऋता आणि अजिंक्य राऊत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. याआधी त्यांनी ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ऋताच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केलं आहे. अभिनेता अमित भरगड, शुभांकर तावडे, ऋषी मनोहर, अभिनेत्री वल्लरी विराज हे कलाकारही झळकणार आहेत.

हेही वाचा >> IAS अधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांना सोनू सूदचा मदतीचा हात; स्कॉलरशिप आणि ऑनलाइन क्लासेसची सुविधा देणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्राची क्रश’ अशी ओळख असलेल्या ऋताने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास ३’ चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावरून भेटीला येत असल्यामुळे तिच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. ऋताच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.