दरवर्षी जगभरात १९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला करतो. पुरुषांशी निगडित वेगवेगळे विषय आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. याला युनेस्कोनेही पाठिंबा दिला आहे. या निमित्ताने अनेक कलाकार हे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री मानसी नाईक हिने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने आंतररराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहे. त्याला कॅप्शन देताना तिने अप्रत्यक्षरित्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

“मी एका अशा कुटुंबात वाढले आहे, जिथे महिलांनी पुरुषांसोबत मिळून किंवा पुरुषांशिवाय बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या आहेत. त्यामुळे आता ती क्षमता गमावण्याची भिती नसेल.”, असे तिने यात म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “नातेसंबंध तोडण्यापूर्वी…” पतीच्या वाढदिवशी मानसी नाईकच्या पोस्टने वेधले लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला कायम ओळखले जाते. मानसी नाईकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वी मानसीने तिचे आणि प्रदीपचे एकत्र फोटोही डिलीट केले होते. त्यानंतर तिने खरेरा हे आडनावही हटवलं आहे. यामुळे ती लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप तिने यावर काहीही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.