मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर सध्या ती सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहे. यातील बहुतांश पोस्ट या तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच मानसी नाईकने एक कविता पोस्ट केली आहे. त्यात तिने देव आणि आयुष्याबद्दल लिहिले आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या एका पारंपारिक फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये एक कविता पाहायला मिळत आहे. या कवितेतून तिने तिचे मन मोकळं केल्याचे स्पष्ट होत आहे. याबरोबर तिने तिच्या चाहत्यांना सुप्रभात असेही म्हटले आहे.
आणखी वाचा : “मी तुमच्यासाठी घटिया औरत…” केतकी चितळेने नेटकऱ्याला सुनावले खडेबोल

मानसी नाईकने पोस्ट केलेली कविता

“देवासमोर उभा होतो,
हताश मी हात जोडून..
डोळ्यामध्ये पाणी होते,
मनातून पूर्ण मोडून..

“देवा !”
मी म्हणालो,
“काय करू कळत नाही”…
“प्रश्नाच उत्तर मिळत नाही”
“विश्वास ठेव”
देव म्हणाला..

“देवा सगळेच रस्ते बंद आहेत
आशेचे दिवे मंद आहेत”
“विश्वास ठेव”
देव म्हणाला..

“देवा आज असं वास्तव आहे
जिथे आशेचा किरण नाही
उद्या काही छान असेल
असा आजचा क्षण नाही
तर कशावर मी विश्वास ठेवावा
जगामध्ये विश्वास आहे
याचा तुझ्याकडे काय पुरावा ? ”

शांतपणे हसत देव मला म्हणाला
“पक्षी उडतो आकाशात,
आपले पंख पसरून
विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर”

“मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो
विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर”

“बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत,
विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर”

“उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो,
विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर”

“आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन,
विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर”

“असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात”
“आजची स्थिती अशीच राहील,असं कुठेही लिहिलेल नाही
उद्याच चित्र कसं राहील, तू काहीच पाहीलेल नाही”

“जिथवर तुझी दृष्टी आहे, त्याही पुढे सृष्टी आहे”
“तुझ्या बुद्धीच्यापलीकडेही बऱ्याच गोष्टीघडत असतात
आशेचे तुटलेले धागे तुझ्या नकळत जोडत असतात”

“तुझ्या नकळत तुझ्यासमोर, असा एक क्षण येईल,
ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल”

“म्हणून….सगळे रस्ते बंद होतील
तेंव्हा फक्त ‘विश्वास ठेव’
जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो देव..!!!”

आणखी वाचा : “आयुष्य बेरंग…” घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसी नाईकने शेअर केलेल्या या काव्यात्मक पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक घटस्फोट घेणार असल्याचे बोललं जात आहे. मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण आता दोघांनीही इन्स्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.