scorecardresearch

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणाली “मी कायम तुमची…”

तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणाली “मी कायम तुमची…”

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यासोबतच प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचा हा फोटो महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कार्यक्रमातील आहे. यासोबत तिने एक खास पोस्टही केली आहे. यात तिने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक खास आठवण शेअर केली आहे. त्यात तिने सर्वांचे सोनी मराठी वाहिनीसह अनेकांचे आभारही मानले आहेत.
“माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

आज महाराष्ट्राची हास्यजत्रा ला ४ वर्षे पूर्ण झालीत. इतकं प्रेम आणि इतरांना हसवण्याचं भाग्य सगळ्यांना थोडीच लाभतं? #सदैव कृतज्ञ, आजही मला माझ्या हास्यजत्रेच्या shooting चा पहिला दिवस लख्ख आठवतोय आणि आजही पहिल्या costume चा photo; gallery मधून हटवला नाहीये. #memories #cantbelieveit #4years and #counting. सोनी मराठीलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. महाराष्ट्राची हास्यजत्रा मी कायम तुमची ऋणी राहिन., असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.

“तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड…”, वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. यानंतर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. त्यासोबत प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनही करताना दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या