"आज ती नसली तरी..." नवरात्रीच्या शुभेच्छा देताना सोनाली कुलकर्णी भावुक, पोस्ट व्हायरल | marathi actress sonalee kulkarni share emotional post on navrati occasion and talk about her grandmother see details | Loksatta

“आज ती नसली तरी…” नवरात्रीच्या शुभेच्छा देताना सोनाली कुलकर्णी भावुक, पोस्ट व्हायरल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवरात्रीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. पण यावेळी ती तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीला मिस करत आहे.

“आज ती नसली तरी…” नवरात्रीच्या शुभेच्छा देताना सोनाली कुलकर्णी भावुक, पोस्ट व्हायरल
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवरात्रीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. पण यावेळी ती तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीला मिस करत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियाद्वारे आपल्या खासगी आयुष्याबाबतही व्यक्त होताना दिसते. काही महिन्यांपूर्वी सोनालीच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन झालं. सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर गणेशोत्सवही साजरा न करण्याचं तिने ठरवलं. यंदा कुलकर्णी कुटुंबियांच्या घरी गणरायाचं आगमन झालं नाही. आतादेखील तिने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : …अन् शोकसभेदरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, “आयुष्यच संपलं…”

आजपासून नवरात्रोत्सवला सुरुवात झाली आहे. याचनिमित्त सोनालीने एक पोस्ट शेअर केली. तसेच या पोस्टद्वारे तिने सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण आजीच्या निधनानंतर सोनाली फारच भावुक झाली होती. आतादेखील नवरात्रीनिमित्त तिने आजीसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

ती म्हणाली, “आज घटस्थापना. माझी आजी घट बसवायची. आज ती नसली तरी मनाच्या देवाऱ्यातील नवदुर्गांमध्ये पहिली जागा कायम तिचीच असेल. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.” सोनालीने यावेळी आजीसह गोड फोटो शेअर केला आहे. तसेच तिला आज आजीची खूप आठवण येत असल्याचं या पोस्टद्वारे दिसून येतं.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत गौरव मोरे लंडनला रवाना, पोस्ट शेअर करत म्हणाला, “खूप भारी…”

सोनाली तिच्या आजीच्या खूप जवळ होती. आपल्या आजीच्या निधनानंतर सोनालीने पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, “आजी तू आमच्यात असशील…आम्ही असेपर्यंत.” सोनालीने तिच्या लग्नातच तिची आजी डान्स करत असताना व्हिडीओही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शाहरुखच्या शर्टलेस फोटोवर गौरी खान कमेंट करत म्हणाली, “आता तू…”

संबंधित बातम्या

“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं…” जितेंद्र आव्हाडांची अक्षय कुमारच्या लूकवर संतप्त प्रतिक्रिया
Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
बिग बींनी पुरवले सहकलाकारांच्या जीभेचे चोचले, सेटवर केली वडापावची सोय
‘५६ इंच का जिगरा नही ५६ इंच का हतौडा…’,जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ चा ट्रेलर प्रदर्शित

व्हिडिओ

ताज्या बातम्या
काँग्रेस विरुद्ध काँग्रेस: “मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही…”; CM गेहलोत यांच्या ‘गद्दार’ टीकेवरुन सचिन पायलट यांचं भावनिक विधान
ICC Player of the Month: नोव्हेंबर महिन्यासाठी जोस बटलरसह ‘या’ दोन खेळाडूंना मिळाले नामांकन, एकाही भारतीयाचा समावेश नाही
“मला संवाद बोलताना…” चित्रपटात अभिनय न करण्याबद्दल मलायकाने केले स्पष्ट वक्तव्य
Video: मुलीकडून किडनी मिळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले “मला चांगलं…”
“तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांचा कर्नाटकच्या नागरिकांना इशारा; म्हणाले “अशी गुंडगिरी…”