Tejaswini Pandit shares post about Swami Samarth : मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. एक अभिनेत्री असण्याबरोबरच ती निर्मातीदेखील आहे. तेजस्विनीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत नाव कमावलं आहे.

स्वामी समर्थांची प्रचिती, अनुभव अनेकांना येत असतो. श्री स्वामी समर्थांची सेवा मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मोठ्या भक्तिभावानं करतात. लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितदेखील स्वामींची भक्त आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर श्री स्वामी समर्थांचा फोटो शेअर करत श्रद्धा व्यक्त केली.

तेजस्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने विठ्ठलाच्या रुपात सजलेल्या स्वामी समर्थांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिलं आहे, “माझ्या मनातलं सगळंच तुम्हाला माहीत आहे, फक्त पाठीशी रहा आणि बळ द्या स्वामी माऊली. आषाढी एकादशी अगदी नजीक येऊन ठेपली असताना हे चित्र नजरेस पडणं म्हणजे किती सुरेख योगायोग.” तेजस्विनी पंडितने शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी ‘श्री स्वामी समर्थ’ अशा कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा लवकरच ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. हा चित्रपट १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटात तेजस्विनीसह सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, उमेश कामत, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजस्विनी पंडीत इन्स्टाग्राम पोस्ट

तेजस्विनी पंडितने ‘येरे येरे पैसा’, ‘100 डेज’, ‘तू ही रे’, ‘समांतर’, ‘देवा’ अशा मराठी चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटात तिने शुर्पणखाची भूमिका साकारली होती. तसेच तेजस्विनीने ‘येक नंबर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.