मराठीतील सदाबहार अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग अजूनही कायम आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून कायमच त्यांना ओळखले जाते. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नंदिनी शिर्के पाटील ही भूमिका साकारत आहे. सध्या वर्षा उसगांवकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवर वाहिनीवर आता होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव करत आहे. या कार्यक्रमात स्टार प्रवाह वाहिनीवरील विविध कार्यक्रमांमधील कलाकार सहभागी होतात. नुकतंच या कार्यक्रमात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली. यात जयदीप, गौरी, शालिनी, मल्हार, माई हे सर्वच कलाकार हजर होते. यावेळी सिद्धार्थ जाधवने वर्षा उसगावकरांना एक टास्क करायला सांगितला.
आणखी वाचा : वर्षा उसगांवकरांना मागवी लागली हात जोडून माफी, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

या व्हिडीओ सिद्धार्थ हा खोटा साप त्या कार्यक्रमात आणतो. तो साप पाहून आधी वर्षा उसगावकर घाबरतात. त्यानंतर त्या म्हणतात की हा जर इच्छाधारी साप असेल तर तो महेशच्या रुपात इथे प्रकट होईल का? त्यावर सर्वजण महेश कोठारेंच्या नावाने ओरडत असल्याने ते मंचावर येतात. यानंतर मंचावर बिलांची नागीण निघाली हे गाणं सुरु होतं.

आणखी वाचा : “…तर मी त्यांची हात जोडून माफी मागते” कोळी समाजाबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वर्षा उसगांवकरांनी मागितली माफी

त्यावर वर्षा उसगांवकर या डान्स करायला सुरुवात करतात. यावर वर्षा उसगांवकरांनी अगदी मंचावर बसून डान्स केला. या डान्समध्ये त्या महेश कोठारेंची मस्करी करताना दिसत आहे. तर महेश कोठारे हे हातात खोटा साप घेऊन नाचताना दिसत आहे. हा डान्स संपल्यानंतर महेश कोठारे हे वर्षा उसगांवकरांचे कौतुक करतात. आजही वर्षामध्ये तितकीच एनर्जी आहे, असे महेश कोठारे म्हणतात.

वर्षा उसगांवकर आणि महेश कोठारे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतानाही दिसत आहे. या व्हिडीओला अनेकजण लाइक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress varsha usgaonkar and mahesh kothare naagin dance video viral nrp
First published on: 20-09-2022 at 17:48 IST