अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.  आतापर्यंत तो अनेक मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो नेहमी त्याच्या सहकलाकारांबरोबर भरभरून बोलताना दिसतो. तर आता महेश मांजरेकर यांच्यासाठी त्याने खास पोस्ट लिहिली आहे.

भूषण प्रधान आणि महेश मांजरेकर लवकरच एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. गेले काही दिवस या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. या शूटिंग दरम्यान भूषण प्रधान आणि महेश मांजरेकर यांच्यात चांगलं बॉण्डिंग झालं. तर आता भूषणने एक पोस्ट लिहित त्याला महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करताना कसं वाटतं आणि त्यांचा स्वभाव कसा आहे हे सांगितलं आहे.

आणखी वाचा : भूषण प्रधान ‘भूषण सीमा प्रधान’ असं नाव का लिहितो? अभिनेत्यानेच केला खुलासा, घ्या जाणून

त्याने महेश मांजरेकरांबरोबरचे काही फोटो शेअर केले. हे फोटो चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काढलेले आहेत. हे फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. तो चित्रपट फक्त ते दिग्दर्शित करत नाहीयेत तर या चित्रपटात आम्ही एकत्र स्क्रीनही शेअर केला आहे, ज्याची स्क्रिप्ट त्यांच्या खूप हृदयाजवळची आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचं आहे. हा माझ्यासाठी खूप कमाल अनुभव आहे. प्रत्येक दिवशी मी त्यांच्याकडून महत्त्वाचे धडे शिकतोय. ते कठोर आहेत, ते समोरच्याचं कौतुक करतात, ते खूप खेळकर, प्रेमळ आणि प्रत्येकाची काळजी घेणारेही आहेत.”

हेही वाचा : “ते दोघेही माझे…”, पूजा सावंतने केलं वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरच्या नात्यावर स्पष्ट भाष्य, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूषण प्रधानांच्या या पोस्टाने आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तर या पोस्टवर कमेंट करत त्याचे चाहते त्याचीही पोस्ट खूप आवडल्यास सांगत आहेत. याचबरोबर त्याला आणि महेश मांजरेकर यांना या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.