scorecardresearch

Premium

“आम्हाला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलायला सांगून त्यांनी…,” लोकप्रिय अभिनेत्याने समोर आणली मराठी सिनेसृष्टीची दुसरी बाजू

चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी त्यांना आलेल्या कटू अनुभवाबद्दल त्याने भाष्य केलं आहे.

eknath gite

मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत, चित्रपटांना शोज मिळत नाहीत, प्रदर्शनाच्या तारखा ऐन वेळी बदलल्या जातात यावरून अनेकदा निर्मात्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं. मोठ्या निर्मात्यांकडून नवीन दिग्दर्शक, कलाकार मंडळींचे चित्रपट दाबले जातात, असा आरोपही अनेकदा केला जातो. हा अनुभव नुकताच ‘गेट टुगेदर’ या मराठी चित्रपटाच्या टीमलाही आला. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता एकनाथ गीते याने मराठी सिनेसृष्टीची ही दुसरी बाजू समोर आणली आहे.

२६ मे रोजी ‘गेट-टुगेदर’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आधी हा चित्रपट १२ मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण नंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला. गेले अनेक दिवस या चित्रपटाची टीम चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होती. त्या दरम्यान ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ गीतेने संपूर्ण टीमच्या वतीने प्रदर्शनादरम्यान त्यांना आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

आणखी वाचा : “…म्हणून आपली मतं आपल्याकडे ठेवून गप्प बसावं,” अनुजा साठेने मांडलं स्पष्ट मत

एकनाथ म्हणाला, “आम्ही आमचा हा चित्रपट आधी १२ मे रोजी प्रदर्शित करणार होतो. पण आम्हाला एका ठिकाणाहून फोन आला आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करायला सांगितलं. ते म्हणाले की, आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा समान होत असल्याने आपल्यामध्ये स्पर्धा नको म्हणून तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख थोडी पुढे ढकलता आली तर बघा. यानंतर आम्ही १९ मे रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं. तसं आम्ही प्रमोशनही सुरू केलं होतं. आम्ही सर्वांना सांगितलं होतं की १९ मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा. पण त्याच वेळी आम्हाला एका दुसऱ्या ठिकाणाहून फोन आला आणि ते आम्हाला म्हणाले की, १९ तारखेला आणखी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे आपल्याला स्पर्धा नको आणि मराठी प्रेक्षक विभागले जाऊ नयेत म्हणून तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख थोडी पुढे ढकला.”

हेही वाचा : Video: अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणण्याची सुरुवात कुठून झाली? स्वतः खुलासा करत म्हणाले होते…

पुढे तो म्हणाला, “त्यांचा फोन आल्यावर आम्हीही मनाचा मोठेपणा दाखवला आणि चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित करायचं ठरवलं. पण नंतर आम्हाला कळलं की ज्यांनी सुरुवातीला आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली होती त्यांचा चित्रपट १२ मेच्या ऐवजी २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे आणि आम्हाला वाईट वाटलं. सांगताना आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला सहकार्य करा, प्रेक्षक विभागले जाऊ नयेत म्हणून प्रदर्शनाची तारीख पुढे ढकला… पण थेट त्यांनी आम्हाला न विचारता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरवली. आमच्या चित्रपटातील कलाकार नवोदित, सगळे तंत्रज्ञ मंडळीही नवीन, आमच्या दिग्दर्शकाचा हा दुसराच चित्रपट आहे, त्यामुळे आम्ही कोणाला बोलूही शकत नव्हतो. आम्हाला अनेक तडजोडी करावा लागल्या, आधी केलेलं प्रमोशन वाया गेलं. त्याचबरोबर आर्थिक नुकसानही झालं. आम्ही हे सर्व सहकार्याच्या भावनेने केलं होतं पण ज्यांना सहकार्य करायला गेलो त्यांनीच असं केलं.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor eknath gite shared bad experience of release of marathi film get together rnv

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×