ऐतिहासिक बायोपिक अशा चित्रपटांची सध्या लाटच आलेली आहे, केवळ हिंदीतच नव्हे तर मराठीतदेखील आता अशा धाटणीचे चित्रपट येऊ लागले आहेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट मागच्या वर्षी सुपरहिट ठरला. स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक याने आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. आता प्रसाद आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही माहिती दिली आहे.

प्रसाद ओक कायमत त्याच्या कामामुळे चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियावरही तो बराच सक्रिय असतो. पत्नी मंजिरी ओकबरोबर तर तो अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. ‘धर्मवीर’नंतर तो आता मराठीतले दिग्गज अभिनेते स्व. प्रभाकर पणशीकर यांच्या बायोपिकमध्ये तो झळकणार आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ‘तोच मी प्रभाकर पणशीकर प्रसाद ओक’, अशी पोस्ट असून ‘नवं वर्ष, नवं स्वप्न सोबत जुनेच मित्र कलावंत आणि आशीर्वाद देणारे आहेत पंत,’ असा कॅप्शनदेखील दिला आहे.

Photos : ॲक्शनला सस्पेन्सचा तडका; जानेवारी महिन्यात प्रेक्षकांसाठी बॉलिवूड चित्रपटांची मेजवानी

या चित्रपटाची प्रसादने नुकतीच घोषणा केली मात्र अद्याप इतर कलाकार कोण असतील याबाबत माहिती उघड केलेली नाही. आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘हर हर महादेव’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले अभिजित देशपांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.

कोण होते प्रभाकर पणशीकर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभाकर विष्णू पणशीकर असे त्यांचे संपूर्ण नाव होते पण त्यांची ओळख ‘पंत’ म्हणून होती. मूळचे मुंबईचे असलेले प्रभाकर पणशीकर अगदी लहान असतानाच त्यांचे रंगभूमीशी संबंध आले. ‘राणीचा बाग’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यानंतर ‘कुलवधू’, ‘भूमिकन्या सीता’, ‘वहिनी’, ‘खडाष्टक’ अशा नाटकांमधून काम केले. ‘ओशाळला मृत्यू’, अश्रूंची झाली फुले ही त्यांची गाजलेली नाटके, मराठी रंगभूमीप्रमाणे त्यांनी गुजराती, कन्नड भाषेत काम केले आहे. अभिनयाच्याबरोबरीने त्यांची स्वतःची नाट्यसंपदा नावाची निर्मिती संस्था काढली. २०११ रोजी त्यांचे निधन झाले.