मराठी मनोरंजन सृष्टीतील बेधडक अभिनेत्यांच्या यादीमध्ये अभिनेते सचिन खेडेकर यांचं नाव सामील आहे. ते त्यांची मतं स्पष्टपणे मांडताना दिसतात. मनोरंजन सृष्टीतील त्याचबरोबर सामाजिक गोष्टींबद्दल ते कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणाने बोलताना दिसतात. आता त्यांनी मराठी चित्रपटांचे शूटिंग परदेशात होण्यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनेक मराठी चित्रपटांचं शूटिंग परदेशात करण्यात येत आहे. यात ‘दे धक्का २’, ‘व्हिक्टोरिया’, ‘झिम्मा’ अशा अनेक मराठी चित्रपटांचं शूटिंग लंडनला करण्यात आलं आहे. तर सध्याही अनेक कलाकार चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनला गेले आहेत. परदेशात शूटिंग करणं हा नवीन ट्रेंडच सुरू झाला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सचिन खेडेकर एकाही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले नाहीत. आता त्यांनी त्याबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “तो कार्यक्रम खूप…,” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची जागा ‘कोण होणार करोडपती’ घेणार! सचिन खेडेकरांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “मला मराठी चित्रपटांची विचारणा होत असते. पण सध्या दोन प्रकारचे चित्रपट येत आहेत. इथे असल्यावर ऐतिहासिक चित्रपट करायचा आणि इंग्लंडला जाऊन मुंबई-पुण्याच्या गोष्टी सांगायच्या. मला हे कधी करता आलेलं नाही. अर्थात याला अपवाद आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘वाळवी’ हे काही उत्तम चित्रपट होते. या मधल्या प्रवाहातील चित्रपट यावा याची मी वाट बघत आहे.”

हेही वाचा : Video: गोष्ट पडद्यामागची- ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या नावाचं सचिन पिळगावकरांशी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या याबद्दलचा त्यांचा आणि जितेंद्र यांचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सचिन खेडेकर सध्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या त्यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.