अभिनेत्री गिरिजा ओक- गोडबोले ही मराठी चित्रीपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गिरिजाने मालिका, चित्रपट आणि त्यासोबतच रंगभूमीही गाजवली आहे. गिरिजा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गिरिजा चाहत्यांच्या संपर्कात असते. मराठी चित्रपटांबरोबरच गिरीजाने बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

हेही वाचा- “मी ऑनलाईन रमीची जाहिरात केली कारण…”, गिरीजा ओक स्पष्टच बोलली

गिरिजा शाहरुखानचा नुकताच प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट जवानमध्ये झळकली आहे. या चित्रपटातील गिरिजाच्या भूमिकेच सगळीकडे कौतुक होत आहे. गिरीजाने शालेय जीवनापासूनच अभिनयाला सुरुवात केली. प्रसिद्ध अभिनेते गिरीष ओक यांची गिरीजा मुलगी आहे. जाहिरातींमध्येही गिरिजाने आपलं वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका मुलाखतीत गिरिजाने आपल्या पहिल्या जाहीरातीबाबात भाष्य केलं आहे.

गिरिजा म्हणाली, “मला लहापणापासून जाहिरात बघण्याची आवड होती. मी टिव्हीवर मालिका आणि चित्रपट बघण्याऐवजी जाहिराती बघत होते. मी पहिली जाहिरात केली तेव्हा मी १२ वर्षांची होते. सॅव्हलॉन साबणाची मी जाहिरात केली होती. त्या जाहिरातीनंतर शाळेत सगळेजण मला सॅव्हलॉन गर्ल म्हणून चिडवत होते. माझ्या आईच्या मैत्रीणीच्या नवऱ्याच्या नवीन ऑफिस ओपनिंगला महालक्ष्मीला फेमस स्टुडिओला आम्ही गेलो होतो. तिथे आम्ही ऑफिस नंबर शोधत फिरत होतो. तेव्हा बिपीन नाडकर्णींनी मला पाहिलं. त्यांनी माझ्या आईला विचारलं मी हिला ऑडिशन करु का. मी आणि आई गेलो त्यांनी मला काही लाईन्स बोलायला लावले. माझे फोटो काढले आणि मला कळवतो म्हणाले.”

हेही वाचा-“विज्ञान, भूगोल, लॉजिक आहेच पण…”, स्पृहा जोशीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिरिजा पुढे म्हणाली, “त्यानंतर मला तीन सॅव्हलॉनच्या जाहिराती मिळाल्या. त्यानंतर मी चाईल्ड मॉडेल म्हणून खूप जाहिराती केल्या. आत्तापर्यंत मी साधारण ८५ ते ९० जाहिराती केल्या आहेत. जाहिरांतींच बजेट खूप चांगल असतं. त्यामधून पैसाही चांगला मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं की वर्षातून एक चित्रपट करावा आणि १० ते १२ जाहिराती कराव्यात.”