मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेत्री व गायिका म्हणून अभिनेत्री केतकी माटेगावकरला ओळखलं जातं. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. पुढे, गायनाची आवड जपत केतकीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘शाळा’, ‘टाईमपास’, ‘तानी’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये केतकीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेत्री तिने बॉडी शेमिंगबद्दल केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

केतकी माटेगावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे नवनवीन फोटो-व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अनेकदा अभिनेत्रीच्या बारीक दिसण्यावरुन किंवा अंगशैलीवरुन नेटकरी नकारात्मक कमेंट्स करतात. बारीक असल्यामुळे तिला ट्रोल केलं जातं. अशा सगळ्या ट्रोलर्ससाठी केतकीने एक भलीमोठी पोस्ट शेअर करत त्यांना स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : “एखाद्या स्त्रीला स्वत:चं मूल नसणं…”, ‘झिम्मा २’च्या कथेबद्दल हेमंत ढोमेने मांडलं मत, म्हणाला, “संवेदनशील विषय…”

केतकी माटेगावकरने तिच्या पोस्टद्वारे बॉडी शेमिंग किंवा एखाद्याला ट्रोल करणं अतिशय चुकीचं आहे असं सांगितलं आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडल्याने तिच्या सगळ्या चाहत्यांनी तिचं समर्थन केलं आहे. एकीकडे, तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवला असून, दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी केतकीच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “अत्यंत हीन दर्जाच्या…”, बॉडी शेमिंग करणाऱ्यांना केतकी माटेगावकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “तुम्हाला सुद्धा घरात बहिणी, आई…”

एका नेटकऱ्याने केतकीच्या पोस्टवर, “इथे एवढी अक्कल पाजळण्यापेक्षा कमेंट सेक्शन बंद करुन ठेवा. इन्स्टाग्रामने तसा ऑप्शन दिलेला आहे” अशी कमेंट केली आहे. यावर “तुम्हाला नसेल वाचायचं, तर नाही बघितली तरी चालेल माझी पोस्ट” असं स्पष्ट उत्तर अभिनेत्रीने दिलं आहे.

ketaki
केतकी माटेगावकर

दरम्यान, केतकीप्रमाणे यापूर्वी मिताली मयेकर, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर यांसारख्या अभिनेत्रींनी सुद्धा जिथल्या तिथे अशा नकारात्मक कमेंट्स करणाऱ्या नेटकऱ्यांना स्पष्ट उत्तरं दिली आहेत.

Story img Loader