आतापर्यंत विविध माध्यमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका सकारात प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. त्या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत.  गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या मृणाल कुलकर्णी यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. नेहमीच त्या सोशल मिडियावर सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. विविध पोस्ट्समधून तसंच मुलाखतींमधून त्या त्यांना आलेले अनुभव शेअर करत असतात. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलेला एक अनुभव खूप चर्चेत आला होता.

मृणाल कुलकर्णी काही वर्षांपूर्वी चीनला फिरायला गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी तळलेले किडे खाल्ले होते. त्याची चव कशी होती आणि तळलेले किडे खाण्याचा तो अनुभव कसा होता हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

आणखी वाचा : “प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

त्या म्हणाल्या होत्या, “काही वर्षांपूर्वी मी, विराजस आणि विराजसचे बाबा असे आम्ही चीनला फिरायला गेलो होतो. तिथे खूप इंटरेस्टिंग पदार्थांची नावं दिसत होती, पण ते नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले. त्याची चव फार छान होती पण त्याचं जे वर्णन होतं ते ऐकल्यावर काही खाण्याची शक्यता नव्हती.”

हेही वाचा : “वर्षं पटापट निघून जातील आणि…” विराजस-शिवानीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवानिमित्त मृणाल कुलकर्णींनी केलेली पोस्ट चर्चेत

त्यांचं हे बोलणं खूप चर्चेत आलं होतं. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते, तसेच मनोरंजन सृष्टीतील त्यांचे मित्रमंडळी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत.