अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आतापर्यंत विविध माध्यमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका सकारात त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली अनेक वर्षं सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या मृणाल कुलकर्णी यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तर आता त्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘सरी’ असं आहे. या चित्रपटात त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेत्री रितिका श्रोत्री स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्या दोघी याआधीही मालिका, चित्रपटांमध्ये एकत्र दिसल्या होत्या. त्या दोघींमध्ये खास नातं आहे आणि ते नातं काय याचा उलगडा मृणाल कुलकर्णी यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

आणखी वाचा : मृणाल कुलकर्णी यांनी खाल्ले होते तळलेले किडे, अनुभव शेअर करत म्हणाल्या, “त्याची चव…”

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “रितिकाला मी गेली अनेक वर्षं ओळखते. तिने आमच्या ‘गुंतता हृदय हे’ मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर मी दिग्दर्शित केलेल्या ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटातही तिने काम केलं होतं. ती आमच्या पुण्याची मुलगी आहे. अनेक वर्षं ती विराजसच्या थिएट्रॉन या नाटकाच्या ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे मी तिला बरीच वर्षं ओळखते, ती लहान असल्यापासून मी तिला बघत आले आहे.”

हेही वाचा : “विराजस, आता तरी…” लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी त्याला दिला ‘हा’ खास सल्ला, पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांचा ‘सरी’ हा आगामी चित्रपट ५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, रितिका श्रोत्री यांच्याबरोबरच अजिंक्य राऊत प्रमुख भूमिका सकारात आहे.